कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला प्रजासत्ताक दिनी फुलपानांची आकर्षक सजावट…

कोपरगाव

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध फुलांनी सजवून सोमेश्वर देवस्थानचे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शहाजीराजे भोसले… छत्रपती शिवाजीराजे महाराज… श्रीमंत पेशवे या सर्वांच्या कालखंडात पवार घराण्याचे स्वराज्य आणि सुराज्य लढाईतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कालखंडात त्यांचे अधिपत्याखाली असलेल्या गावांचा कारभार अतिशय उत्तम आणि सर्वसमावेशक समजला जातो…भारत स्वातंत्र्यानंतर श्रीमंत पवार सरकार संस्थान मध्यभारत संघात विलीन झाले.


कोपरगाव नगरीतील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले गेलेले सोमेश्वर महादेवावर आजही ग्रामस्थांची मोठी श्रध्दा आहे. कोपरगाव शहरात जल संकटात या महादेव मंदिराचा गाभारा पुर्ण पाण्याने भरल्यानंतर सोमेश्वर महादेव जल संकटात अनेकदा धावून येतो.अशी ग्रामस्थांची भावना आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त झेंडू,शेवंती,गुलाब,गुलछडी,चंदनपाला आशा विविध फुलं पानांचा उपयोग सोमेश्वर महादेव शिवलिंग सजवितांना केला आहे…देवस्थानचे पुजारी श्री.नंदू शेंडे, श्री.विजय वाघमारे यांनी सुमारे दोन तास मेहनत घेऊन सजवले आहे.तसेच मंदिराचे द्वारावर आंब्याचे पानांचे तोरण बांधले आहे…
अध्यात्मिक भक्ती ईतकीच राष्ट्र उपासना महत्वाची असल्याचा संदेश या निमित्ताने श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापनाने दिला आहे…
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील, व्यवस्थापन समितीचे श्री.नारायणशेठ अग्रवाल,श्री.मंगेशराव पाटील (मा.नगराध्यक्ष), श्री.महावीरशेठ शिंगी, श्री.मनोजजी कपोते,श्री.चंद्रकांतजी कौले साहेब,श्री.मनोजजी शिंदे,श्री.अमितजी गुजराथी, श्री.निलेशजी उदावंत, देवस्थानचे पौरोहित्य श्री.प्रविणशास्री मुळे गुरु, श्री.प्रदिपजी पदे गुरु, श्री.गोपीजी जोशी गुरु,बेट व्यवस्थापनचे ॲड.सुभाषजी मुंदडा साहेब,श्री.तुषारजी आव्हाड,श्री.दादा नाईकवाडे, श्री.मच्छिंद्रजी सोनवणे,श्री.दिपकजी शिंदे,श्री.खंडेराव वाघमारे गुरव, जेऊर कुंभारी व्यवस्थापनचे श्री.पाटीलबा वक्ते,चि.ओम कपोते यांचे सह सोमेश्वर महादेव भक्त मंडळ कामकाज पहात आहे…
श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे कार्यात योगदान देणारे सर्वांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांत घोडके यांनी आभार मानून शुभेच्छा दिल्या आहेत…
सत्यम शिवम सुंदरम्
भारत माता कि जय
जय हिंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *