
जिल्ह्यातील उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे यांची जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांच्याकडून घोषणा….

राहाता तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- जनतेप्रती उत्तरदायित्व ठेवतं तालुक्यातील मतदार यादी पारदर्शक व समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यावर भर देण्यात येईल. अशा शब्दात राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी आज येथे मार्गदर्शन केले.
राहाता तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०२२ निमित्ताने मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून श्री.हिरे बोलत होते.
यावेळी राहाता पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख वरपे, तालुका निरीक्षक पाटील,कृषी अधिकारी शिंदे, नायब तहसीलदार रंधे ,ओहोळ याप्रसंगी उपस्थित होते.
उपस्थित मतदारांना रमेश राऊत यांनी मतदार प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमापूर्वी अहमदनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट सहायक मतदान नोंदणी अधिकारी म्हणून तहसीलदार कुंदन हिरे यांच्या नावाची घोषणा केली.
श्री. हिरे पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन तसेच तालुका प्रशासनातील सहकारी यांनी कामात वेळोवेळी केलेलं सहकार्य यामुळे उत्कृष्ट सहायक मतदान नोंदणी अधिकारी पुरस्कार मिळाला.
विशेष मोहिमेचा कालावधी वगळता मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी तसेच यादी भागातील नाव वगळणे, मतदार ओळखपत्रांतील तपशीलामध्ये दुरुस्ती करणे आणि एका यादी भागातून दुस-या यादी भागात नाव स्थलांतरीत करण्यासाठी अनुक्रमे नमूना ६,७,८ आणि ८ अ हे अर्ज भरुन देण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यवाही निवडणूक शाखेमार्फत निरंतरपणे चालू आहे. असेही श्री. हिरे यावेळी सांगितले.
मतदार दिनाच्या निमित्ताने रांगोळी, वक्तृत्व, भाषण, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यातून प्रत्यकी प्रथम २ क्रमांकाना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. २७० बीएलओ पैकी १० बीएलओ यांना उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला.


कार्यक्रमात विद्यार्थी सोहम अत्रे, हर्षिता गायकवाड तसेच उत्कृष्ट बीएलओ पुरस्कार मिळालेले शिक्षक दत्ता गायकवाड, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी इरफान शेख, पंकज जैन, शंकर कासार, मजहर पठाण, संजय शितोळे यांनी परिश्रम घेतले.
नायब तहसीलदार रंधे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मुंतोडे यांनी केले. याप्रसंगी पत्रकार दिलिप चोखर, दिलीप खरात, जयंत गायकवाड, किरण वाबळे, विद्यार्थी पालक, नव मतदार, ग्रामस्थ, बीएलओ उपस्थित होते.
