संजीवनी बी. फार्मसी व सिनअिर महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर सुरू..!!
कोपरगांव प्रतिनिधी:-
आपल्या देशाचा आर्थिक, सामाजीक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भूमिका आहे. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य या योजनेतमुन घडत आहे. राष्ट्रीय योजनेमुळे सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्व सिध्द करतात. यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही एक युवा चळवळ बनली आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संजीवनी कला, वाणिज्य, शास्त्र आणि संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने शिंगणापूर येथे आयोजीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री कोल्हे बोलत होते. सदर प्रसंगी सरपंच सुनिता संवत्सरकर, माजी उपसरपंच अंकुश कुऱ्हे , पोलीस पाटील सविता आढाव, भिमराव संवत्सरकर, प्रशांत आढाव, सुनिल शिंदे , ग्रामसेवक जे. के. शिंदे , डायरेक्टर डाॅ. किशोर साळुंखे, समन्वयक प्रा. शशिकांत होन, प्रा. ऋषिकेश जगझाप, डाॅ. सरिता भुतडा, डाॅ. मुक्ता शिंदे , प्रा. युवराज काशीद व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनी परीवार नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतो. साईबाबा काॅर्नर ते कोपरगांव रेल्वे स्टेशन वृक्षारोपन व संवर्धन, कोविड काळातील गरजुना मदत व समाजउपयोगी कामे, स्थलांतरीत मजुरांची प्रवास व्यवस्था, इत्यादी कामे प्रामुख्याने करण्यात आली. संजीवनीच्या राष्ट्रीय सेवा योजने मार्फत ब्राम्हणगाव येथिल बंद पडलेला आठवडी बाजार सुरू केला, महिलांच्या आजारांबाबत जनजागुती केली, देर्डे येथिल बंधाऱ्याला मजबुती दिली, धामोरी येथे वृक्षारोपन केले, जलसंवर्धन, महिला व मुलींच्या हिमोग्लेाबिन व रक्त गटाची तपासणी, असे विविध उपक्रम राबवुन आदर्श घालवुन दिला. या सर्व उपक्रमांमधुन शिक्षण क्षेत्रातुन तरूणांवर सेवा संस्कार घडावा, तरूणांकडून राष्ट्रसेवा घडावी हा हेतु आहे. तसेच श्रम संस्काराबरोबरच ग्रामिण जीवन कसे असते याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा , असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.
प्रज्ञा सोनवणे या विद्यार्थिनीने सुत्र संचालन केले तर प्रा. जगझाप यांनी आभार मानले.

फोटो ओळी: श्रम संस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे.
