स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन साजरा करणार:- राजेंद्र कोयटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने बारा जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व खुल्या गटात काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्य मैफिल आयोजित करण्यात येणार असल्याचे कवी राजेंद्र कोयटे यांनी सांगितले आहे
शब्द गंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या वेळी ते बोलत होते
परीषदेचे अध्यक्ष कैलास साळगट सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले उपाध्यक्ष प्रा डॉ संजय दवंगे यांनी उपक्रमांची माहिती दिली या अविस्मरणीय दिनानिमित्त वृत्तपत्र छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांना मिळालेला पुरस्कार व पत्रकार दिनानिमित्त शाखेच्या वतीने दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
स्वातीताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले येत्या वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व योजना आर्थिक मदत इत्यादी विषयांचा मागोवा घेतला प्रा मधुमिता निळे यांनी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करून नवोदितांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे विचार मांडले
कवी प्रमोद येवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सभासद नोंदणी करण्यासाठी सिद्ध असल्याचे व्यक्त केले तालुक्यात शब्दगंध साहित्यिक परिषद प्रत्येक नवोदितांना प्रेरणा देण्यासाठी सदैव तत्पर आहे असे विचार मांडले
दिवंगत माई सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ प्रातीनीधीक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार असून त्यासाठी कविता पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले
उपस्थित सभासदांचा सत्कार करून दिनदर्शिका प्रदान करण्यात आली
प्रा मधुमिता निळे यांच्या काव्य गायनाने सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *