
वरिष्ठ पत्रकार माधव ओझा, सामाजिक कार्यकर्ते डॉ.धनंजय जगताप, गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांची उपस्थिती…
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारत देशा विषयी राष्ट्रीयत्वाची भावना दृढ होईल असे लहान मुलांना घडवा.पालकांनी त्यांना चांगला देशवासी बनवा म्हणजे तुम्हाला वृध्दाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही.अशी भावना एन.डी.टी.व्हीचे वरिष्ठ पत्रकार माधव ओझा यांनी व्यक्त केली.
सूर्यतेज संस्था,कोपरगाव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सा. समर्थ टाइम्स,वाघडकर जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेंद्र बाजीराव वाघडकर यांचे सहकार्यातून शिवजयंती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले होते.

प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पुजन, दीप-प्रज्वलन व वृक्षारोपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई (माई) सपकाळ, वृक्षप्रेमी बंडूनाना चिंचपुरे यांचे सह दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी एन.डी.टी.व्ही.चे वरिष्ठ पत्रकार माधव ओझा, शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.धनंजय जगताप, केंद्रीय शाळा अभ्यासगट समिती सदस्य तथा गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे,गुरु शुक्राचार्य देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन, डॉ.संदिप मुरुमकर, सोमेश्वर महादेव व्यवस्थापक व साई गांव पालखीचे मनोज कपोते,विद्या प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,शिशु विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.सरिता कोर्हाळकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.ओझा पुढे म्हणाले,आज पालक लहान मुलांना शिक्षण लादत आहे.मुलांकडून हसून खेळून अभ्यास करून घेणे गरजेचे आहे.जीवन आनंदी जगण्यासाठी प्रत्येकाने कला जोपासाला हवी.जगात बुध्दीमान व चांगल्या लोकांची संख्या खुप आहे.त्यांचेमुळेच जग रहाटी चालण्यास मदत होते. असे सांगितले.
तर शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.धनंजय जगताप यांनी वृक्षारोपण व पर्यावरणाचा संदेश देत जीवन रंगीबेरंगी सजविले पाहिजे. असे सांगितले.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांची केंद्रीय शाळा गुणवत्ता सुधारणा अभ्यासगटाच्या सदस्यपदी निवड झाल्या बद्दल विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सूर्यतेजचे विविध शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सूर्यतेजचे प्रा.अनिल अमृतकर,प्रा.अतुल कोताडे,आनंद टिळेकर,शाळेचे सौ.माधुरी कुलकर्णी, श्रीकांत गवळी, अमोल देवकर, ग्रंथपाल योगेश कोळगे,संदिप वदक,अनंत गोडसे,महेश थोरात यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन शेटे,प्रा.प्राजक्ता राजेभोसले यांनी केले.वंदेमातरमने सांगता झाली.बक्षिस विजेत्यांना सन्मान चिन्ह व भारत सरकार आयुष मंत्रालय निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.श्री.शिवरत्नजी शेटे सर यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले…

शिवजयंती उत्सव २०२१ :- चित्रकला स्पर्धा
निकाल पत्रक –
गट अ : (५वी-६वी)
प्रथम क्रमांक – दिया दारूवाला(संजीवनी अकॅडमी,द्वितीय क्रमांक – कृष्णप्रिया साळुंके (शारदा इंग्लिश मिडीअम),तृतीय क्रमांक अन्वी उंबरकर (समता इंटरनॅशनल स्कूल)
गुणवत्ता :अश्विन थोरे (महर्षी स्कूल),प्रियल लोखंडे(संजीवनी इंग्लिश मिडीयम), गायत्री आवारे(श्री.गो.विद्यालय),जिज्ञासा जंगम(डॉ.सी.एम. मेहता) ,साईश्री कानडे(संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम), शिफा कुरेशी(न.पा. शाळा क्र.१), गौरी बागले(चक्रधर स्वामी प्राथमिक),प्रतिक्षा कदम (जिल्हा परिषद शाळा, तळेगाव मळे), संकेत पंडित(एम.के.आढाव विद्यालय),अफशा शेख(मौलाना मुनीर अहमद उर्दू), साईश गलांडे(रेनबो इंटरनॅशनल स्कूल), ईशिका भिंगारदिवे(सेवा निकेतन),मदिहा खान(न. पा. उर्दू शाळा क्र. ४),अक्सा सय्यद्(न. पा. उर्दू शाळा क्र. ४),हर्षल परजणे(नामदेवराव परजणे),प्रणाली आगळे(न.पा. शाळा क्र. ९, खडकी),मीरा विश्वकर्मा(न. पा. शाळा १०),स्वरा रोहमारे(रेनबो इंटरनॅशनल), तसमिया शेख(मौलाना मुनीर अहमद उर्दू),ओम पाचपुते(न.पा. शाळा क्र.६), श्वेता मकासरे(न. पा. शाळा क्र.३),पायल बागुल(न.पा. शाळा क्र.१),परशराम शेजूळ(न.पा.शाळा क्र.९) शिवम जाधव(न.पा.शाळा क्र.५)अनुष्का आवारे(नामदेवराव परजणे),यश चौधरी(के. बी. पी. विद्यालय), ओम धनराळे(के. बी. पी. विद्यालय),अंजूम सय्यद(जि.प.प्राथमिक,कोकमठाण), अनुष गायकवाड (भागचंद माणिकचंद ठोळे)
गट ब : (७वी- ८वी)
प्रथम क्रमांक – कृतिका भालके (संत जनार्दन स्वामी महर्षी)
द्वितीय क्रमांक – आदित्य शेळके(संजीवनी सैनिकी स्कूल),तृतीय क्रमांक – तेजस ताजणे (संजीवनी सैनिकी स्कूल) गुणवत्ता – सार्थक वाघ(श्री.गो. विद्यालय),सार्थक दवंगे(जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर),आयुष औताडे(संजीवनी अकॅडमी),संदिप साठे(एम. के. आढाव विद्यालय), प्रेम देवडे(संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम),साईशा इंगळे(श्री. गो. विद्यालय)
गट क : ( ९वी – १०वी)
प्रथम क्रमांक – वैभवी निकुंभ(महर्षी विद्यालय),द्वितीय क्रमांक – शताक्षी जाधव(महर्षी विद्यालय),तृतीय क्रमांक – निखिल वाणी(संजीवनी सैनिकी) गुणवत्ता – श्रुती कोल्हे(राधाबाई काळे कन्या विद्यामंदीर),साक्षी चंद्रे(राधाबाई काळे कन्या विद्यामंदीर),मनिष गिरमे(विद्या प्रबोधिनी),तेजस लोहकरे(विद्या प्रबोधिनी),रुजुल रोहमारे(समता इंटरनॅशनल),सत्यम आबक(जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर),मृण्मयी चव्हाण(डॉ. सी.एम.मेहता)
गट ड : खुला गट
प्रथम क्रमांक – किशोर अशोक भोसले,द्वितीय क्रमांक – रजत प्रशांत बडजाते,तृतीय क्रमांक – गौरी अजय दिवटे,गुणवत्ता- समृद्धि सुरेश कदम
सर्वांचे अभिनंदन…
रयतेचा राजा… सुखी राहो प्रजा…
जय शिवराय…
जय हिंद…
