गौतम पब्लिक स्कूलमध्ये लसीकरण मोहीम संपन्न..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- मागील दोन वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्व भयभीत झाले होते. पहिल्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागले आहे. या जीवघेण्या आजारावर लसीकरण एकमेव पर्याय असून १८ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे देखील लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत संस्थेचे मार्गदर्शक माजी आ.अशोकराव काळे, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी विद्यार्थांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी तातडीने लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लसीकरण मोहीम संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

यामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री.नूर शेख, जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी येथील आरोग्य सेवक सौ.अरुणा गाताडे, कु.भोसले जे.एस., आशा वर्कर सिंधू थोरात, पूजा वाबळे व गौतम स्कूलचे सेवक वर्ग उपस्थित होते.

फोटो ओळ:-
गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण करतांना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *