कुंभारी येथे कै.एकनाथराव घुले यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त व SJS हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन परमपूज्य रमेशगिरीजी महाराज व परमपूज्य १०८ राघवेश्वर नंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-

कै. एकनाथराव माधवराव घुले यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त व SJS हॉस्पिटल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राघवेशवर मंदिर सभागृह कुंभारी मध्ये आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उदघाटन परमपूजे रमेशगिरी महाराज तसेच परमपूजे १०८ राघवेशवर नंदगिरी महाराज यांच्या शुभहास्ते करण्यात आले

धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहार व विहार पद्धतीने तसेच कोरोना आजारपण मुळे आज प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडावे लागते. वेळच्या वेळी या आजारांच्या तपासण्या करून निदान केले गेले नाही तर त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे काळाची गरज बनली आहे असे परम पुजे रमेशगिरीजी महाराज म्हणाले व प्रशांतभाऊ घुले दर वर्षे त्यांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर घेत असतात .राघवेशवरनंदगिरी महाराज म्हणाले एकनाथराव घुले यांच्या कुटुंब धार्मिक आहेत परीवारतील सदस्य धार्मिक आहेत असेच कार्य चालू राहावे. कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती सौ.पौर्णिमाताई राहुल जगधणे या होत्या ,पंचायत समिती उप सभापती अर्जुनराव काळे,SJS हाॕस्पिटल चे चेअरमन चांगदेवराव कातकडे, रेनबो शाळेचे सचिव संजयराव नागरे, हारीभाऊ शिंदे, के पी रोकडे साहेब ,मारुतीराव चौधरी,वसंतराव आव्हाड,सोपानराव ठाणगे ,दिलीप ठाणगे ,शंकरराव शेळके,सुभाष घुले,सुदाम घुले,विठ्ठल घुले,श्रीकांत पैठणे माहेगांव ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे,,संतोष कदम सखाहारी देवकर,सुभाष बढे,संदेश घुले,डाॕक्टर विजय गोडगे,आदी गावकरी उपस्थित होते,ग्रामपंचायत उपसरपंच दिगंबर बढे,ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ ,अशिष थोरात,वसंत घुले,

यावेळी एकूण २०५ रुग्णांच्या आस्थिरोग व सांधेरोपन तज्ञ, हृदयरोग तज्ञ, छातीरोग व क्रीटीकल केअर तज्ञ, स्त्री रोग तज्ञ स्रियांच्या विविध प्रकारच्या आजारांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच प्रत्येक हृदयरोग व मधुमेही रुंग्नांची मोफत रक्त तपासणी, शुगर, बी. पी., इ.सी.जी. तपासणी हाडांची तपासणी ,तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी , SJS हॉस्पिटल डॉ. पूज कातकडे ,डॉ. सायली ठोंबरे डॉ.राजगुरू सर, डॉ. प्रशांत सगळगिळे सर, डॉ. राहुल पारधे सर ,डाॕ उबाळे सर ,सह्याद्री हाॕस्पिटलचे जनसंपर्क प्रमुख महेश रक्ताटे व त्यांच्या २० लोकांचा स्टाप या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभारी गावचे लोकनियुक्त सरपंच श्री प्रशांतजी घुले व शिवाजीराव घुले, नारायण घुले, सिद्धांत घुले व परीवार यांनी केले.कार्यक्रम चे सूत्र संचालन वाल्मिक निळकंठ सर यांनी केले व आभार शिवाजीराव घुले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *