
कोपरगाव प्रतिनिधी:- एस एस जी एम व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सद्ध्या व्हिजेटी आय मुंबई महाविद्यालयीन विद्यार्थिनी भाग्यश्री ज्ञानेश्वर वालडे ( गोदाम गल्ली तील वडेवाले) हिची बँक ऑफ अमेरिका ( शाखा वाशींगटन डि सी) येथे सिनीअर टेक असीसटंट पदावर कॅंपस इंटरव्ह्यू मधे निवड झाली तिच्या या निवडीबद्दल गोदाम गल्ली प्रतिष्ठान सांची वेल्फेअर फौंडेशन चंद्रमा कलर फोटो चे वतीने सन्मान चिन्ह ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सौ मंगल हेमचंद्र भवर सौ नबाबाई दशरथ पवार श्री संत हरीबाबा इलेक्ट्रीकल चे पानगव्हाणे श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या सोनवणे मतकर सांची वेल्फेअर फौंडेशनचे रविंद्र साबळे सर अविनाश पाटील दिनेश संत आदि मान्यवर उपस्थित होते कु भाग्यश्री वालडे हिच्या प्रगतीचा आदर्श घेऊन मुलींनी प्रगती करावी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे असे विचार सौ मंगल हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले
