

कोपरगाव प्रतिनिधी:-
ग्रामीण रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने (NUHM) १५ ते १८ वयोगटातील १२२६ विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लसीकरण दि.०६ जानेवारी २०२२ रोजी के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पार पडले.
सदर कनिष्ठ महाविद्यालयात Covid -19 मिशन १५ ते १८ लसीकरण अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना Covaxin लसीचे लसीकरण करण्यात आले. नवीन वर्षाच्या आगमना बरोबरच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे भविष्यात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात कोव्हिडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मा.श्री.अशोकराव रोहमारे (अध्यक्ष,को.ता.एज्यू. सो.), महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.बी.एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा.बी.आर. सोनवणे यांच्या संकल्पनेतून १२२६ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

डॉ.गायत्री कांडेकर (वैद्यकीय अधिकारी,UPHC कोपरगाव), डॉ.कृष्णा फुलसौंदर (वैद्यकीय अधीक्षक, कोपरगाव ग्रामीण रुग्णालय) यांचा मार्गदर्शना खाली श्री. जोशी एस.ए. (आरोग्य सहाय्यक), शिवदे एम.आर , लोखंडे पी.एम. (आरोग्य कर्मचारी), आरोग्य सेविका श्रीमती कुमावत, श्रीमती नवले, श्रीमती बनसोडे, व आशा सेविका सुपेकर, गायकवाड, गौल, आहिरे , पुरोहित, शिर्के यांनी लसीकरण पूर्ण केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे, उप-प्राचार्य प्रा.बी.आर. सोनवणे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. डोंगरे जी .एन. तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर लसीकरणासाठी परिश्रम घेतले.
