दि.२३ डिसेंबर रोजी मुंबई येथे नगरविकास मंत्री आदरणीय नामदार श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्ना संदर्भात भेट घेतली:-संतोषजी गंगवाल…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दि.२३/१२/२०२१ गुरुवार रोजी मुंबई येथे नगरविकास मंत्री आदरणीय नामदार
श्री . एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी कोपरगांव शहराच्या पाणीप्रश्ना संदर्भात भेट घेतली . पाणीप्रश्नाच्या प्रशासकीय मंजुरीचे काम नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नगरविकास मंत्रालयाकडेच असल्याने लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी देऊन कोपरगांव शहराचा बिकट असलेला पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी विनंती त्यांना केली व आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांना माहिती दिली . तसेच याबाबतचे निवेदन त्यांना दिले .


श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः प्राधान्याने कोपरगांव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालतो असे यावेळेस सांगितले . त्यांनी विधानसभा सत्र सुरु असतांना देखिल त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून भेटीसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे कोपरगांव शहराच्या नागरीकांच्या वतीने खुप खुप आभार ….

तसेच शिवालय येथे शिवसेनेचे सचिव व खासदार श्री. अनिलजी देसाई साहेब यांचीही भेट झाली. त्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले व कोपरगांव शहराचा पाणीप्रश्न सोडवीण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून सर्वोतोपरी मदत करतो असे सांगीतले,
तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी जे आपल्या पाणीयोजणेचे काम बघत आहेत यांची मंत्रालयात भेट घेतली . त्याप्रसंगी श्री. राजेशजी मंटाला ,
श्री. संतोषभाऊ गंगवाल, श्री.तुषारजी विद्वांस ,शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री. प्रविणजी शिंदे , श्री. मनोजजी कपोते हे सोबत होते.
मुळचे कोपरगांवकर असलेले सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री.निलेशभाऊ धुमाळ यांच्या प्रयत्नांनी आजची भेट शक्य झाली . श्री.निलेशभाऊ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनपुर्वक धन्यवाद .
हे सर्व बघता लवकरच आपल्या कोपरगांव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *