
कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-
देवळाली प्रवरा हेल्प टीम चे सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट साहसी खेळाडू म्हणून शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेले अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या जन्मदिनाचे निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन देवळाली प्रवरा हेल्प टीम आणि महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती व दानशूर मंडळींचे वतीने कोरोनाने छत्र हरपलेल्या ९ मुलिंना प्रत्येकी १० हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोडवर असलेल्या सहारा मंगल कार्यालय या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे हे अनुकरणीय उदाहरण आहे. अश्या प्रकारे डामडौलांस फाटा देवुन समाजाचे ऋणातून उतराई होण्याच्या आदर्श आप्पासाहेब ढुस तसेच देवळाली प्रवरा हेल्फ टीमने घालुन दिला आहे. त्याचे कौतुक शहरातील नागरिक करत आहेत.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी आणि देवळाली प्रवरा हेल्प टीम चे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी केले आहे.
