
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री क्षेत्र पुणतांबा येथे हिंदूंचे हृदय स्थान प्रभू श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र आयोध्या मंदिर जीर्णोद्धार, मनामनातील राम जागून राष्ट्र मंदिर घडवूया !
श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण राष्ट्रिय स्वाभिमानाची पुनर प्रतिष्ठापना ब्रीद नजरेसमोर ठेवून समस्त ग्रामस्थ पुणतांबा यांच्या सहकार्याने श्रीराम मंदिर श्रीक्षेत्र पुणतांबा येथे परमपूज्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे व समस्त ग्रामस्थ पुणतांबा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिरासाठी निधी संचय समारंभ संपन्न झाला


यावेळी महाराजांच्या शुभहस्ते संचयन पुस्तिका अनावरण करून महाराजांनी उपस्थितांना निधी संचयनासाठी आवाहन केले ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला ग्रामस्थांच्यावतीने परमपूज्य महाराज यांचे स्वागत प्रथम लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. महाराजांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रीराम प्रतिमा रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी समस्त ग्रामस्थ पुणतांबा बहुसंख्येने उपस्थित होते.
