

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील
एस ए फाउंडेशन तसेच चर्मकार समाज बांधवांच्या वतीने जगद्गुरू श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी आमदार आशुतोष काळे,औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव नगर परिषदेचे गटनेते रवींद्र पाठक

यावेळी कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनीही भेट देऊन संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी रक्तदान शिबिराची पाहणी करून चांगला उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनीही एस.ए. फाऊंडेशनचे कौतुक केले. ह्याच बरोबर कोणतेही डी.जे व कुठलेही वाद्य न लावता कोरोनाच्या काळातील शांतमय वातावरणात चांगला उपक्रम राबविला तसेच या ठिकाणी रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे सागरजी आहेर यांचे कौतुक केले.

तसेच कोपरगाव शहरात नव्याने हजर झालेले कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनीही यावेळी एस ए फाउंडेशनने आयोजित केलेल्या संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन सध्या सुरू असलेल्या covid-19 संसर्गजन्य प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक असून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे व शासनास सहकार्य करावे असे आपल्या भाषणात म्हणाले.


यावेळी एस ए फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर आहेर आपल्या भाषणात म्हणाले की संत शिरोमणी रविदास महाराज यांचा जन्म
इ.स.न 1367 साली उत्तर प्रदेशातील बनारस काशी येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव संतोखदास व आईचे नाव कलसादेवी होते त्यांचा पिढी जात चर्मकार व्यवसाय होता अतिशय तन्मयतेने व्यवसाय करीत त्यांच्या कामाच्या अचूकतेमुळे व स्वभावामुळे सर्व जनमाणसावर प्रभाव झालेला होता” मन चंगा तो कठौती में गंगा “या दोह्याच्या घटना पाहिली तर त्याच्यामधील अवगत गुणांचा अर्थबोध होईल मन चंचल असेल तर गंगास्थान करून पुण्य मिळणार आहे काय या प्रसंगावरून त्यांचा मन चंगा तो कठौती में गंगा हा दोहा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

तसेच याप्रसंगी एस ए फाउंडेशनचे
रोहित जाधव,सागर आहिरे,ओम वाघ,दीपक जाधव,रवी आहेर,सचिन मेंदळे,ज्ञानेश्वर जाधव,विजय पवार,छगन पवार,सोमनाथ पवार,मधुकर पवार,शिवाजी आहेर,सचिन आहेर,प्रवीण आहेर,सूरज सोनवणे,कल्पेश पवार,शेखर डहांके,सूरज लटके,सोनू लटके,सोनू मणियार,सुजल चंदनशिव, सोनू शिंदे,मुकेश रेठे, कल्पेश पवार संजीवनी ब्लड बँकेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. नीता पाटील




