
कोपरगाव प्रतिनिधी:-
पोहेगाव येथे आयोजित आमदार चषक – २०२१, भव्य क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.

या स्पर्धेत फ्रेंड्स इलेवन ग्रुप कोऱ्हाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून कोपरगाव इलेवन व छत्रपती इलेवन पोहेगाव ग्रुपने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.


याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, प्रदीप औताडे, राजेंद्र औताडे, प्रदीप वाके, वाल्मिक नवले, प्रमोद रोहमारे, जयंत रोहमारे, काका शिंदे, प्रवीण शिंदे, सचिन नवले, दिलीप औताडे, अतुल औताडे, पांडुरंग औताडे, कैलास औताडे, भाऊसाहेब औताडे, शुभम औताडे, अंकित औताडे, अंकुश कांबळे, मयूर वाके आदींसह सहभागी संघाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
