कोपरगाव नगरपरिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, बहुतांश नगरसेवक आणि मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी यांचे उपस्थितीत सभा पार पडली. विषय पत्रिकेवरील 36 विषयांपैकी 1 विषय तहकूब करण्यात आला. दारणा व निळवंडे या दोनही ठिकाणचे पाणी आरक्षण अबाधित ठेवण्याची सर्वांनीच मागणी केली. तरीही गदारोळ, आरोप प्रत्यारोप, आरडाओरड झाल्यानंतर नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांनी विषय समजावून सांगितल्यावर विषय मंजूर झाला. या विषयावर सर्वांची सहमती असूनही कोल्हे व काळे गटाच्या नगरसेवकांनी ओढूनताणून बराच गदारोळ केला.
हिंदु दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, 30 वर्षांपासून रहात असलेली घरे सफाई कर्मचाऱ्यांना देणे, गोदावरी नदी संवर्धनासाठी व तीर्थक्षेत्र विकासाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, काही संस्थाना ओपन स्पेस तांत्रिकबाबी पुर्ण करून देणे, आगामी नगरपरिषद निवडणुक संभाव्य खर्चास मान्यता, छ. शिवाजी महाराज व्यापारी संकुल डागडुजी, इतरही व्यापारी संकुलांची पाहणी करणे स्वच्छता सर्वेक्षण 2022 अंतर्गत कोपरगाव शहर ODF++ व थ्री स्टार घोषित करणे, आरोग्य-विद्युत इ. विभागाचे वार्षिक खरेदीचा विषय, शिवरात्र यात्रेची जागा इ.अनेक विषय मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे छ.शिवाजी महाराज कमान उभारण्यास मान्यता देण्यात आली.
नगराध्यक्षांनी आयत्या वेळच्या विषयांत मांडलेले जनरल बीपीनकुमार रावत, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, स्व.यशवंतराव चव्हाण, महाराणा प्रताप यांची नावे विविध रस्त्यांना देण्याचेही ठरले. गुरुद्वारा रोडला कमान उभारण्यास मान्यता, इनडोअर हॉल मैदानास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे नांव देण्याचेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या आग्रहावरून सर्वानुमते मान्य करण्यात आले. पण याविषयावरही काहींनी आक्षेप घेतला हे दुर्दैवी असल्याची खंत नगराध्यक्षानी व्यक्त केली. खरे तर राष्ट्रीय प्रतिमा असणाऱ्या व्यक्तीच्या नावांमुळे कोपरगाव शहराचाच सन्मान होणार आहे. स्व.नामदेवराव
परजणे पा.लॉ कॉलेज भाडे करार नूतनीकरण विषयावर गदारोळ झाल्याने विषय तहकूब ठेवण्यात आला.
शेवटची सभा असल्याचे भान ठेवून सर्वांनी शांतपणे साधकबाधक चर्चा करणे आवश्यक होते. पण तसे आवाहन करूनही काहींनी भान सोडल्याची खंत नगराध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केली. सभागृहात राजकारणविरहित चर्चा-विचारविनिमय झाल्यास शहरविकासाची कामे वेगाने होतील हेही सन्माननीय सदस्यांनी लक्षात घ्यावे असे आवाहन करून त्यांनी गेल्या पाच वर्षात सहकार्य करणाऱ्या सर्वच नगरसेवक, तिन्ही मुख्याधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शहरातील सर्व पत्रकारांचे आभार मानले.
यानंतरच्या निवडणुकीनन्तर सत्तेत कुणीही आले तरी सामान्य नागरिक व शहरविकासाचीच काळजी करा असेही भावनिक आवाहन त्यांनी केले व त्यानंतर अखेरच्या सर्वसाधारण सभेची संगता झाली. नूतन मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी यांनी पहिल्याच सभेत प्रशासनाची बाजू व्यवस्थित सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *