शंभर टक्के वसुली बद्दल सहकारी सोसायट्यांच्या अध्यक्षांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सहा सहकारी सोसायट्यांचा बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा जिल्हा सहकारी बँकचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे यांनी २०२०.२१ या आर्थिक वर्षात सहकारी सोसायट्यांच्या वसुली बाबत माहिती दिली.
सहकारी सोसायटया हया अल्पभूधारक, लहान शेतक-यांच्या प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्यातुन शेतीसाठी लागणारे खेळते भांडवल मिळते तेव्हा या माध्यमांतुन वितरीत झालेल्या कर्जाची वसुली प्राधान्याने व्हावी आणि केंद्र व राज्य शासनांच्या तसेच जिल्हा सहकारी बँक पातळीवर असणा-या योजनांचा शेतक-यांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करत अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व सर्व संचालकांचे सहकार्य बँक कामकाजात मिळत असल्याचे प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी यावेळी बोलताना केले. महेश्वर सोसायटी (येसगांव) उपाध्यक्ष रामराव डुंबरे, सचिव शिवाजी दवंगे, चांगदेवराव कोळपे सोसायटी (कोळपेवाडी) अध्यक्ष भाऊसाहेब कोळपे, उपाध्यक्ष वसंतराव लकडे, सचिव भानुदास पानगव्हाणे, उमरावती सोसायटी (देर्डे को-हाळे) अध्यक्ष देवराम गवळी, उपाध्यक्ष साहेबराव शिंदे, सचिव अशोक घेर, लक्ष्मी सोसायटी (चांदेकसारे) अध्यक्ष आण्णासाहेब होन, उपाध्यक्ष शरद होन, सचिव विजय खरात, कैलासगिरी सोसायटी (वारी) अध्यक्ष प्रकाश भाकरे, उपाध्यक्ष प्रदिप भाकरे, सचिव ज्ञानदेव मंचरे, गोधेगांव नंबर एक सोसायटी अध्यक्ष सुभाष कानडे, उपाध्यक्ष नारायण सोळसे, सचिव आण्णासाहेब निकम, तसेच शिवाजीराव कोकाटेे यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

चौकट :-
येसगाव सहकारी सोसायटीचे यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सोसायटी येसगाव असे नामकरण करण्यात आले.

फोटो ओळी :-
कोपरगाव तालुक्यातील सहा सहकारी सोसायट्यांचा बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा जिल्हा सहकारी बँकचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *