
पुणतांबे प्रतिनिधी:- ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी महेष गोरखनाथ चव्हाण. यांची आज एकमताने निवड झाली. त्यांच्या निवडीची घोषना होताच कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतेषबाजी झाली. कार्यकत्यांनी एकमेकांना पेढे भरविले.

पुणतांबे-रस्तापुर ग्रुपग्रामपंचायत श्री विखे गटाकडे असुन पंचायतीच्या कारभारात त्यांची सत्ता आहे. सरपंच पद हे लोकनियुक्त आहे. प्रत्तेक सदस्याला सत्तेची माहीती व्हावी यासाठी ऊपसरपंच पद दहा महीन्यासाठी विभागुन ठेवले आहे. जनसेवा मंडळाच्या बैठकित हा निर्णय पुर्वीच झाला आहे. याचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आतापर्यत यापुर्वी तिन ग्रामपंचायत सदस्यांनी हे पद ऊपभोगले. मावळते ऊपसरपंच योगेश घाटकर. यांची दहा महीन्याची मुदत सपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. आज नव्याने पुन्हा ऊपसरपंच पदाची निवड होऊन महेष चव्हाण. यांची बिनविरोघ निवड झाली.
या निवडीनंतर सरपंच डाँ धनंजय धनवटे. योगेश घाटकर. माजी सरपंच मुरलीधर थोरात. संगिता भोरकडे. राजेंद्र थोरात. साहेबराव बनकर. प्रताप वहाडणे. किसन बोरबणे. आदींच्या ऊपस्तीतीत ऊपसरपंच चव्हाण. यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करन्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतेषबाजीमुळे परिसर गजबजला होता. रस्तापुर भागाला पंधरा वर्षांनतर ऊपसरपंच पदाची संधी मिळाल्याने चव्हाण वस्ती. बनकर वस्ती. बोरबणे वस्ती भागातील ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला पेठे वाटले
फोटो ओळी:- ऊपसरपंच पदी महेष चव्हाण. यांची निवड झाल्यावर ग्रामपंचायत सभागृहात त्यांचा सत्कार करतांना सरपंच डाँ धनंजय धनवटे. व ईतर कार्यकर्ते.
