सोनसाखळी चोरट्याकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदार महिलांना कोपरगाव पोलिसांनी केला परत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव शहरातील वेगवेगळ्या घटनेतील सोनसाखळ्या चोरीच्या घटनेतील आरोपींना पकडुन त्यांच्या कडुन मुद्देमाल जप्त करत तक्रारदार महिलांना त्यांच्या सोनसाखळ्या परत देण्यात आल्या आहेत अशी माहिती कोपरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.२२/९/२०२१ रोजी सकाळी ९:२० चे सुमारास फिर्यादी नामे श्रीमती संगीता गणेश देशमुख वय ५४ वर्षे धंदा नोकरी रा.साईनगर, कोपरगाव ता. कोपरगाव जि अहमदनगर या डॉ. डी. एस मेहता विद्यालय कोपरगाव विद्यालयात पार्कींग मध्ये त्यांची स्कुटी पार्कींग करीत असतांना अचानक दोन आरोपींनी मोटार सायकलवर जवळ येवुन मोटार सायकलवरील पाठीमागील बसलेल्या इसमाने फिर्यादीचे गळयातील मंगळसुत्र मिनी गंठन ६००००/-रु किमतीचे बळजबरीने हिसकावून चोरुन पळुन घेवुन गेले आहे. त्यावरून त्यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोस्टे गु रजि नबर 293/2021 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच दिनांक 03.10.2021 रोजी 08:30 वा चे सुमारास फिर्यादी पुजा किशोर ओढेकर वय 29 वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. प्राजक्ता सदन काळेमळा, पुनम टॉकीमागे, कोपरगाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळया जवळुन मॉर्निंग वाक करुन परत येत असतांना रस्ता पार करण्यासाठी रस्त्याचे बाजुला उभे असतांना त्यांचे पाठीमागुन विना नंबरची काळया रंगाची बजाज पल्सर मोटार सायकलवर दोन आरोपींनी अचानक जवळ येवुन फिर्यादीचे गळयातील 60,000/-रु किमतीची सोन्याची पोत 14.9 ग्रॅम वजनाची बळजबरीने हिसकावून चोरुन घेवून पळून गेले आहे. त्यावरुन कोपरगाव शहर पोस्टे गु रजि नंबर 300/2021 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.वरील प्रमाणे दोन्ही गुन्हे करण्याची पध्दत ही एकसारखी असुन दोन्ही गुन्हे करणारे आरोपी हे एकच असल्याचे संशय असल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सो, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर दिपाली काळे मॅडम, मा उपविभागिय पोलीस अधिकारी शिर्डी श्री संजय सातव सो. पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर, व त्यांची टिम तसेच पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व पोलीस स्टाफ अशांनी आरोपीचा कसोशीने शोध घेवून सदर गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडेस तपास करुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन ।) गु रजि नबर 293/2021 भादवि कलम 392.34 व 2) गु रजि नंबर 300/2021 भा द वि कलम 392,34 मधील गेला माल 60,000/- रु कि चे मनी मंगळसुत्र मिनीगंठन व 60,000/-
रुकिची सोन्याची पोत असा एकुण 1,20,000/-रु • कि चा मुद्येमाल हस्तगत करुन आज दिनांक 07/12/2021 रोजी दोन्ही गुन्हयातील तक्रारदार यांचे ताब्यात दिला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई ठोंबरे हे करीत आहेत.
महिलांचे गळ्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र शोधून आणून महिला पोलिस यांचे हस्ते महिलांचे गळ्यात पुन्हा तेच मंगळसूत्र बांधून परत केले .पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *