संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विद्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ४. ५१ लाखांवर निवड निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगाव


पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीने केली निवड…
कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आशिया, युरोप आणि युएस मध्ये ग्राहक जाळे असलेल्या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधिल अंतिम वर्षाच्या १५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली असुन त्यांना प्रशिक्षण काळात रू ४- ५१ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनंजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की विद्यार्थी जेव्हा प्रथम अथवा थेट द्वीतिय वर्षात संजीवनी मध्ये प्रवेश घेतात, तेव्हा आपणास संजीवनीच्या माध्यमातुन हमखास नोकरी मिळेल, अषी अपेक्षा ठेवतात. तसेच पालकही आपला पाल्य आता या स्पर्धेच्या काळात स्थिर स्थावर होईल, अशी महत्वकांक्षा बाळगत पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी राबवत असलेल्या विविध उपक्रमांना साथ देत असतात. त्यामुळेच संजीवनीच्या माध्यमातुन ग्रामिण विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमतध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यात संजीवनी यशस्वी होत आहे.
अलिकडेच पर्सिस्टंट सिस्टिम्स या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. यात गोपाल प्रभाकर पाणीग्रही, अनिकेत शशिकांत मते, सुशांत सुहास सबनिस,वैभव धोंडीबा जाधव, पुजा पुखराज पिपाडा, सुजाता संतोष चव्हाण, सुशांत अरूण भालेराव, योगेश मिलींद राणे, हिरण आयुष पारस, रूपाली शिवाजी गेरकर, अर्पिंत संदिप बोरावके, उत्कर्ष मिलींद बोरावके, अपेक्षा जगदिश गिरी, गायत्री महेदं्र कुलकर्णी व विशाल भागवत चौधरी यांचा समावेश आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *