वाढदिवस जगण्याची प्रेरणा देतात:- विजय बंब ( प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर)…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाच्या जीवनातील वार्षिक वाढदिवस त्या निमित्ताने होणारे सत्कार मिळणाऱ्या शुभेच्छा माणसाला जगण्याचे बळ देतात संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरणा देतात असे विचार जेष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब यांनी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे दिलीप शेठ अजमेरे मयूर इलेक्ट्रीकल चे योगेश जोबनपुत्रा यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रमा कलर फोटो गोदाम गल्ली प्रतिष्ठान व जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात बोलताना विजय बंब यांनी आपल्या भाषणात सांगितले की जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद नेहमी लढण्यासाठी बळ देतात जेष्ठ नागरिक म्हणजे अनुभवाची विद्यापीठे आहेत त्यांनी सोसलेले अनभव नव्या पिढीला मार्गदर्शक ठरतात


सन्मान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते दिनेश संत चंद्रमा कलर फोटो चे हेमचंद्र भवर निलेश जोबनपुत्रा आदित्य काॅमपुटर सांची वेल्फेअर फौंडेशनचे रविंद्र साबळे विमा पॉलिसी चे पाटणी जगदीश अपार्टमेंटचे अध्यक्ष सोमनाथ व्यवहारे विज वितरण चे वाघ साहेब आदि मान्यवर उपस्थित होते


साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की आज सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असताना माणूस माणसापासून दुरावला आहे तरीसुद्धा मनातील प्रेम कमी झाले नाही सर्व शासकीय प्रशासकीय नियम पाळून जगले वागले तर आरोग्य संपन्न जगता येते प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी भ्रमणध्वनी सेवा चालू आहे जेव्हा आठवण येते तेव्हा मनापासुन दोन शब्द प्रेमाचे बोलले तरी उत्साह निर्माण होतो आणि जगण्यासाठी हिंमत येते कोणीतरी आपल्या बरोबर पाठी आहे हि भावना लढण्यासाठी प्रेरणा देते म्हणून साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा सन्मान महत्वाचे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *