शिर्डीच्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:-
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना शिर्डीच्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा.आ.के.बी.रोहमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.

पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातुन आर्थिक दृष्ट्याध दुर्बल असणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होतो.भविष्यात उदभवणाऱ्या जीवघेण्या व्याधींवर वेळीच उपचार होऊन नागरिकांचे प्राण वाचविण्यामध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिराची महत्वाची भूमिका आहे.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार के.बी.रोहमारे यांची पक्षनिष्ठा आणि विचारधारा एक होती. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी जिल्हा व तालुक्यात विकासाच्या बाबतीत वेगळा ठसा उमटविला असून समाजकारणाबरोबरच काळे-रोहमारे परिवाराने तीन पिढ्यापासून ऋणानुबंधही जपले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे,ऍडव्होकेट विद्यासागर,शिंदे, तसेच रमेश रोहमारे, साईनाथ रोहमारे, एम.टी. रोहमारे,संजय रोहमारे, डॉ.दत्तात्रय मुळे,संदीप रोहमारे, ऍडव्होकेट राहुल रोहमारे,डॉ. संजय उंबरकर, डॉ. योगेश लाडे, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. संकेत मुळे, डॉ. प्राजक्ता मुळे, डॉ. प्रियंका मुळे, डॉ. दिपाली आचार्य, डॉ. नितीन गवळी, डॉ. शैलेंद्र बनसोडे, राजेंद्र रोहमारे, बलराज रोहमारे, सुनील बोरा,के.जे.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत ऍडव्होकेट राहुल रोहमारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार संदीप रोहमारे यांनी मानले.यावेळी पोहेगाव व पंचक्रोशीतील अनेक गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *