
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोरोनाच्या संकटाने उग्र रूप धारण केले आहे . मे महिन्यामध्ये हि केवळ लाट न राहता ‘ सुनामी ‘ होईल अशी टिपन्नी दिल्लीच्या आय.आय.टी ने केलेली आहे . मे महिन्यातील ५ मे ते २५ मे हा कालावधी अतिशय धोकेदायक असणार आहे अशी भिती या संस्थेने व्यक्त केलेली आहे . अनेक सेवा भावी संस्था कोविड रूग्ण सेवा सुरू करू इच्छिताहेत , परंतू प्रशिक्षित रूग्न सेवकांच्या अभावी कोविड सेंटर सुरू करायला अडचणी आहेत . जिल्हा परिषद मार्फत अशा सेवकांची भर्ती करून ग्रामीण रूग्णालयांच्या देखरेखी खाली जर हि सेवा पुरवता आली तर अनेक सेवा भावी संस्था जागा व पैसा उपलब्ध करून या कार्यास हातभार लावायला तयार आहेत . ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ऑक्सीजनचा पुरवठा होऊ शकणार असेल तर अशा काही केंद्रावर सुध्दा गरजू पेशंटची सोय त्यांच्या गावाजवळ मिळल्यास त्यांचे प्राण वाचविता येतील . या कामी काही सेवाभावी डॉक्टर मंडळीही अशा सेंटरला मार्गदर्शन व सेवा कार्य करायला तयार आहेत . त्या त्या ठिकाणच्या छोटया छोटया संस्थाही औषधांसाठी व दैनदिन कामकाजासाठी आर्थिक मदत करायला तयार आहेत . जिल्हापरिषदेने ग्रामीण रूग्नालयाच्या अंतर्गत प्रशिक्षित रूग्ण सेवक व सेविकांची भरती करून दिल्यास गावोगावी सेवा कार्य होतील . असा विश्वास कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते अॅड रविकाका बोरावके यांनी व्यक्त केला आहे .
