कोईमतूर ऊस संशोधन आणि विकास सोसायटीचे उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांची देशपातळीवर काम करणाऱ्या कोईमतूर येथील उस संशोधन आणि विकास सोसायटीच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली; त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतातील उस संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी आयसीएआर शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट कोईमतुरच्या शास्त्रज्ञांनी या सोसायटीची स्थापना केली असून त्याचे देशभरात २५१ सदस्य आहेत, त्यात अध्यक्ष म्हणून आयसीएआरच्या संचालक डॉ. हेमाप्रभा तर उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सरचिटनीस डॉ. आर. करुप्पैयन यांनी दिली.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विवेक कोल्हे सध्या सहकारी साखर कारखानदारीत भारतात सर्वप्रथम सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यात पॅरासिटामॉल हा औषधी प्रकल्प साकारत असुन त्याची उभारणी ते करत आहे.
विवेक कोल्हे हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत गेल्या पाच वर्षापासून तज्ञ संचालक म्हणून काम करत आहेत. ते उच्चविद्याविभूषित आहेत, शेतकऱ्यांचे हेक्टरी उस उत्पादन वाढवुन, चांगला साखर उतारा देणाऱ्या उस लागवड व बेणे यावर केलेल्या अथक व यशस्वी प्रयत्नातूनच त्यांची देशपातळीवरील संस्थेत उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, तर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोरोना लॉकडाऊनला संधी मानुन 2 वर्षापासून सतत उस विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या बांधावर जात ऊस विकासाचा धडक कार्यक्रम घेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाची विवेक कोल्हे यांच्या अभ्यासात भर पडली आहे.
“देशपातळीवर सध्या उसाचे हेकटरी उत्पादन वाढवणे, कमी पाण्यात, कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन कसे मिळेल आदी घटकांचा अभ्यास कोईमतूर येथील ही उस संशोधन सोसायटी करत असुन या संस्थेच्या उपाध्यक्षपदावर युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांची निवड सार्थ ठरणार आहे. श्री विवेक कोल्हे यांनी कमी कालावधीत उस शेती, सहकारी साखर कारखानदारी, उपपदार्थ निर्मीती, सहवीज, इथेनॉल निर्मिती, आसवनी , बायोगॅस प्रक्रिया व त्यातून वीज निर्मीती आदी घटकांचा अभ्यास करून यात अडचणीच्या ठरणाऱ्या बाबीवर लक्ष केंद्रीत करत आहे.
थेट शेतकऱ्याच्या बांधावर जात उस उत्पादन लागवड, त्यावर येणाऱ्या किडी, त्यातून होणारे नुकसान याबाबत विवेक कोल्हे स्वतः दक्ष असतात त्यांच्या या निवडीमुळे आता उस संशोधन क्षेत्रात देशपातळीवर चालना मिळेल असा विश्वास साखर उद्योगातील असंख्य तज्ञांनी व्यक्त केला.
त्यांच्या निवडीबद्द्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) शुगर टेक्नॉलॉजी प्रमुख डॉ. आर. व्ही. दाणी, भाजपाचे युवा आमदार राम सातपुते (माळशिरस), अध्यक्ष, भारतीय शुगर (पुणे) व व्हाईस प्रेसिडेंट (टेक्निकल) डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (पुणे) चे विक्रमसिंह शिंदे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कोल्हे कारखान्यांचे सर्व आजी_ माजी संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *