
संविधान हा भारतीय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली
मा.तहसिलदार श्री.विजय बोरुडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत २६नोव्हेंबर राष्ट्रीय संविधान दिन उत्साहाने संपन्न झाला.
या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कोपरगांव चे तहसिलदार मा.विजय बोरुडे यांचे हस्ते संविधान प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.कैलास ठोळे यांनी संविधान दिनाचे महत्व स्पष्ट करतांना विदयार्थीनी उत्तम नागरीक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.संस्थेचे सचिव दीलीपकुमार अजमेरे यांनी संविधान दिना निमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी इयत्ता १०वी तील कु.तनया संत,व प्रथमेश कुलकर्णी यांनी संविधान दिनाचे महत्त्व विषद केले.
विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.आर.बी.गायकवाड ,जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही,कामगार तलाठी संदीप चाकणे,तांगडे,आदी या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री,एस.डी.गोरे तर आभार श्री.कोताडे ए.जे.यांनी मानले.
या प्रसंगी तहसिलदार विजय बोरुडे यांनी संविधान दिना निमित्त विदयार्थीना शपथ दिली आणि या विषयी माहीती सांगितली.ते म्हणाले संविधान हा भारतिय सार्वभौम तत्वाचा मुळ पाया आहे.व त्यामुळे प्रत्येक नागरीकांना हक्क व कर्तव्याची जाणीव झाली.व त्यामुळे विदयार्थीनी शालेय जीवनात संविधानाचा अभ्यास करावा,म्हणजे त्यांना उत्तम नागरीक होण्यास मदत मिळेल.
तहसिलदार श्री.विजय बोरुडे व मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा आभियाना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले
या कार्यक्रमाला श्री.लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,अमृतकर ए.बी आदि शिक्षक सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.
