पुणतांबा पाणी योजनेतील त्रुटी दूर झाल्याशिवाय त्यात पाणी सोडु नये:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
पुणतांबा व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणाऱ्या पाणी योजनेसाठी 17 कोटी रुपये निधी आणुन योजनेचे काम दर्जेदार व्हावे ही पुणतांबेकरांची गरज असुन त्यातील निकृष्ट कामाच्या असंख्य तक्रारी आपणापर्यंत आल्या, यासंदर्भात जबाबदार प्रशासकीय यंत्रणेस सुचना केल्या असून कामातील अनिश्चितता व त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला.
सौ. कोल्हे यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झालेल्या योजनेचे दोन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले असून साठवण तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दोनदा पिंचीग खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे अनेक तक्रारीनंतर सौ कोल्हे यांनी आज साठवण तलाव कामाची प्रत्यक्ष पाहणी केली कामाचा दर्जा बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व कामाचा दर्जा चांगला राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशा सूचना दिल्या. संपूर्ण राज्यात सर्वप्रथम पुणतांबा व रामपुरवाडी पाणी योजनेसाठी शेती महामंडळाची जमीन मिळवून दिली ही ऐतिहासिक बाब असुन पुढच्या पिढ्यासाठी पाणी योजना फायदेशीर ठरणार असुन व मोठा निधी एकदाच मिळत असल्याने या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही व संबंधित यंत्रणेने पुणतांबेकराच्या जीवाशी खेळ खेळु नये असा इशारा कोल्हे यांनी यावेळी दिला.
स्थानिक कमिटीच्या सदस्यांकडून योजना कामाची योग्य देखरेख होत नसल्याबद्दल त्यानी खंत व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी निकृष्ट कामाचे अनेक नमुने यावेळी दाखविले साठवण तलावाचे काम योग्य झाल्यानंतरच तलावात पाणी सोडावे तसेच कोकमठाण येथे सुरू असलेल्या योजना कामाची पाहणी करून त्याप्रमाणे काम करावे अशा सूचना कोल्हे यांनी ठेकेदाराला केल्या.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी सरपंच सर्जेराव जाधव, सुधाकर जाधव, दादासाहेब सांबारे, संभाजी गमे, किसन बोरबने, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
चौकट
अनेक निवडणुकीत गाजलेला प्रश्न
अनेक पंचवार्षिक निवडणुकीत पुंनतांब्याचा पाणी प्रश्न केवळ प्रचाराचा मुद्दा ठरला, मात्र तो सुटला नाही. सुदैवाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि महसूलमंत्री चंदकांत दादा पाटील आदींनी ही योजना मार्गी लावत त्यासाठी १७ कोटी रुपयांचा संपूर्ण निधी देऊन महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविल्याने मोठे समाधान असल्याचे सौ कोल्हे यांनी सांगितले.

फोटो ओळी:-
पुणतांबा येथे सुरू असलेल्या जलस्वराज्य टप्पा 2 योजनेतील साठवण तलाव कामाची पाहणी करताना स्नेहलता कोल्हे व इतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *