कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. जे.सोमैया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कोपरगाव येथील डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्या वतीने महाविद्यालय स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने पुनरारंभ पारितोषिक प्रदान व गौरव समारंभ सन्मान सोहळा : २०२१ या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पटेल, श्री. राजेश पांडे, संचालक डॉ.संतोष परचुरे तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरवण्यात आले. डॉ. संजय दवंगे हे महाविद्यालयात सन २०१३ – १४ पासून विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असून मागील पाच वर्षात त्यांनी विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवून व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक कामे केली. या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव अॅड.संजिवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे व सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन :-
(सा. फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट विद्यार्थी कल्याण अधिकारी पुरस्कार स्विकारतांना डॉ. संजय दवंगे, प्रा. विजय ठाणगे व प्रा. रवींद्र जाधव.)
