
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतीय राज्य घटनेने माणसाच्या मुलभूत अधिकार गरजांची पूर्तता करण्यासाठी हक्क आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत साधारणतः माणूस हक्कांविषयी जागरूक असतो पण आपले कर्तव्य विसरताना दिसतो शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सवलती सुविधा हक्काने प्राप्त करून घेतो परंतु आपली कर्तव्य सहजतेने विसरून जातो आपल घर दुकान स्वच्छ करून कचरा रस्त्यावर टाकून मोकळे होतात युज ऑड थ्रो (वापरा आणि फेकून द्या) जमान्यात प्लास्टिकच्या पिशव्या थर्माकोल आणि तत्सम पदार्थ रस्त्यावर गटारीत फेकून दिला जातो परिणामी गटार तुंबणे वास येणे घाणीचे साम्राज्य निर्माण होते आणि मग नगरपालिका बदनाम केली जाते शासनाच्या कोणत्याही उपक्रमाला सक्रिय लोक सहभाग महत्त्वाचा ठरतो नगरपालिका कर्मचारी स्वच्छता अभियान राबवित असताना लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे यासह सर्व ठिकाणी सहकार्य केले तरच गावचा विकास आरोग्य आर्थिक संपन्नता राहिल अन्यथा आडवा आणि जिरवा मधे सर्वाचीच जिरते आहे
स्वच्छ माझ घर सुंदर माझ गाव
कोपरगाव त्याच नाव..!!
