आत्मा मालिक ध्यानपीठात २१ नोव्हेंबरला महानुष्ठाण सप्तमाह आत्मसाधानाचे आयोजन:- संत निजानंद महाराज…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- परमपुजनीय सदगुरु माऊलींच्या आदेशानुसार संपूर्ण विश्वात्मक कार्यासाठी महानुष्ठान देण्यात आलेले आहे. आत्मस्वरुपाच्या असिम कृपेने प्राप्त झालेली ही शाश्वत मुक्तीची साधना करण्याचा हा महायोग समस्त जीवांसाठी महा पर्वणी आहे. कोकमठाण आश्रम मध्ये साधना आज कार्तिक पोर्णिमेपासुन सुरु झालेली आहे. सदर आत्मसाधना ही संपूर्ण विश्वात्मक कार्यातील तमाम जीवांसाठी आहे म्हणूनच रविवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. या महाअनुष्ठान आत्मसाधनेची माहिती घेण्यासाठी सर्वांनीच उपस्थितीत राहवे.नावनोंदणी चे फार्म याच वेळेस वितरित करण्यात येणार आहेत. तरी सर्व आत्मसंघटक, सत्संग मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि भाविकांनी उपस्थितीत राहुन गुरुआज्ञेचे पालन करावे अशी विनंती आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांच्यासह सर्व संत परिवाराने केले आहे
चार लाख वाचक असलेल्या सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी या लिंकचा वापर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *