
कोपरगाव.प्रतिनिधी:-
“ऐसी कळवळयाची जाती करी लाभाविण प्रिती” माणूस काय पक्षी प्राणी काय? सगळे सारखेच पुढे धोका आहे हे माहीत असूनही काही कर्म करीत आहेत. आधाराची काठी म्हणून मुलांना लहानाचे मोठे करायचे अनेक खस्ता खाऊन संकटांचा सामना करुन रेघारूपाला लावायचे ते म्हतारपणी सांभाळतील या अपेक्षेने सारे करायचे आणि मग कालांतराने प्रत्येकाच्या मनात जगण्या वागण्यात बदल होत जातो. काही जेष्ठ मंडळींची अवहेलना मानहानी केली जाते. तर काहींना वॄदधाश्रम दाखविला जातो याऊपर कडि म्हणजे काहि महाभाग म्हातारया आई-वडिलांना कुंभमेळ्यात धार्मिक क्षेत्रात सोडून देतात यापेक्षा कडी आई-वडील मारुनच टाकतात.
तस पक्षांच नाही. पक्षी आपल्या पिलांना जन्म झाला कि उडून जाईपर्यंत खाऊ घालतात उडायची शिकवण देतात पिल ऊडुन गेल्यानंतर विरहाचा टाहो फोडायला सुरुवात करत नाही पहिली पिल स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याची क्षमता ठेवून नवीन घर…
