गौतम पब्लिक स्कुल येथे मोहम्मदिया क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक २०२१ (प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा) स्पर्धेचे बक्षीस वितरण आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
गौतम पब्लिक स्कुल येथे मोहम्मदिया क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित आमदार चषक २०२१ (प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा) स्पर्धेचे बक्षीस वितरण आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या स्पर्धेत मोहम्मदिया क्रिकेट क्लबने प्रथम पारितोषिक मिळवले असून बजरंग तालीम संघ सुरेगाव (मोतीनगर), शूटर बॉईज कोळपेवाडी व आयकॉन ग्रुप संगमनेर यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, मोहम्मदिया क्रिकेट क्लबचे शोयब पटेल, मुक्तार शेख, सर्व सदस्य, मातोश्री ग्रुप, विविध संघाचे खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *