देवळाली प्रवरा मध्ये बंद पाळून व्यापारी हिरेन यांचे हत्येचा जाहीर निषेध दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करु:- आप्पासाहेब ढुस….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनीधी (देवळाली प्रवरा):-
बेलापूर येथील प्रथितयश व्यापारी गौतम झुंबरलाल हिरन यांचे अपहरण करून क्रूर हत्या झालेंबद्दल देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशन च्या वतीने शिवाजी चौक येथे श्रद्धांजली व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेत देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील सर्व व्यापाऱ्यांनी हिरेन यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व दोषींना कठोर शिक्षा करणेसाठी असोसिएशन च्या वतीने पोलीस खात्याला निवेदन देणेत आले.
या प्रसंगी देवळाली प्रवरा गाव बंद ठेवून हिरेन हत्येचा निषेध व्यक्त करणेचा सर्वानुमते निर्णय घेतला गेला. व दोषींवर लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारावे लागेल असा विनंतीवजा इशाराही संबंधित खात्याला सर्वांनी दिला.
या श्रद्धांजलीपर निषेध सभेत ललित देसर्डा, आप्पासाहेब ढुस, नेमीचंद शिंगी, डॉ. संदीप मुसमाडे आदींनी हिरेन यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
या निषेध सभेला ललित देसर्डा, आप्पासाहेब ढुस, नेमीचंद शिंगी, डॉ. संदीप मुसमाडे, जालिंदर मुसमाडे, महावीर गदिया, संतोष मुथा, पोपट चंगेडे, सुभाष देसर्डा, डॉ. प्रवीण बोरा, हेमराज वर्मा, आनंद देसर्डा, संतोष देसर्डा, आशिष देसर्डा, सतीश मुथा, हेमंत चोरडिया, सावळेराम कदम, अशोक कदम, अशोक मुसमाडे, विजय कदम, योगेश जाधव राम शिंदे, अब्बास पटेल, देवदत्त मुसमाडे, श्रीकांत चांडक, गणेश कांबळे, प्रमोद शिंगी, सकाहरी भांड आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *