

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री. क्षेत्र सप्तशृंगी गड येथे एस ए फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व मा.श्री सागर आहेर हे आई सप्तशृंगी मातेचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले असता त्यांचा सत्कार माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विकासपुरुष राजेशभाऊ गवळी यांनी केला.


यावेळी श्री. राजेंद्र जी, राजु आहिरे, रोहित जाधव, कल्पेश पवार, ओम वाघ, करण सोनवणे, बंटी चौवरे, सोनू मनियार, सुरज लटके, किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, विकास चव्हाण, विकास डांगरे उपस्थित होते .राजेश भाऊ गवळी हे श्री.सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे गेल्या १५ वर्षापासून सदस्य व सरपंच सुध्दा असुन त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत सप्तशृंगी गडावर विकासाचा महामेरु रोवला आहे आजसुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरिबांची अहोरात्र ते सेवेत व्यस्त असतात खर्या अर्थाने सप्तशृंगी गड हे अर्धेशक्तिपीठ गणल्या गेले असुन आज हजारो लाखो भाविक भक्त तेथे सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लांब-लांबुन परराज्यातुन भक्त आवर्जून येत असतात. राजेश गवळी हे कोणताही गर्व न बाळगता भाविक भक्तांच्या सेवेत मग्न होत असतात तसेच ह्या ठिकाणी गल्ली बोळातील रस्त्यांची कामे झाली , ग्रामपंचायत इमारत नव्या रुपात बांधकाम झाले, लाईट मर्क्युरिस चे मोठ-मोठे खांब चे काम झाले , स्मशानभूमीचे काम, तसेच सर्वात मोठे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लावला, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु वाटप, वनविभागाच्या जागेसाठी नामदार दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून लोकांना सार्वजनिक कामासाठी वनविभागाची जागा १० एकर मंजुर करण्यात आली, ह्या अनमोल कामासाठी त्यांना साथ देणारे नामदार दादासाहेब भुसे, सप्तश्रृंगी गड ग्रामस्थ, कळवण सुरगाणा मतदार संघाचे राष्ट्रवादी आमदार नितीनभाऊ पवार, नाशिक जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पवार, वस्ंत वामन साळुंके, शांताराम सद्गीर, रमेश बर्डे, दिलीप बर्डे, जिवन पवार ह्या सर्वांची साथ लाभली आणि सर्व पक्षासंगे त्यांचे नातेसंबंध विकासाच्या कामासाठी चांगले असुन कोणाशीही मतभेद न ठेवता काम पुर्ण केले.या अनुषंगाने त्यांची जिवाभावाची मैत्री असलेले एस ए फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व मा.श्री सागरजी आहेर यांची नुकतीच सप्तशृंगी मातेच्या गडावर भेट झाली असता हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल भेट घेवुन सागरजी आहेर यांना सप्तश्रृंगी गडावर प्रसाद रुपि आईसाहेबांचा एक आशिर्वाद म्हणुन त्यांना आईचा फोटो देवुन सत्कार करण्यात आला.
