पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतात १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा पुर्ण:- सौ. स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोरोनाच्या जागतिक महामारीत भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम येथील शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देवुन त्यावर लसीचे संशोधन करून त्याचा संपूर्ण जगाला पुरवठा करत १३० कोटी लोकसंख्येच्या महाकाय असलेल्या आपल्या देशातील १०० कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पुर्ण करण्यांत जगात आघाडी घेतली त्याबददल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे असुन त्यांच्या या मोहिमेचे भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत जग लॉकडाउन झाले असतांनाही भारतवासियांच्या सुख-दुःखात साथ देत ८० कोटी जनतेच्या पोटात मोफत अन्नधान्याचा घास भरविला. सीरम इन्स्टीटयुट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेडडीज लॅबॉरेटरीज, झायडसकडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा, पॅनेशिया बायाडेट या सात भारतीय लस उत्पादक प्रमुखांशी चर्चा करून भारताबरोबरच जगाला त्याचा पुरवठा केला. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय, राज्यमंत्री भारती पवार यांच्याबरोबरच १०० कोटी लसींचा टप्पा ओलांडण्यांत भारतातील प्रत्येक रहिवासींयांचा मोलाचा वाटा आहे. कोरोना महामारीचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहावे, स्वत:बरोबर, परिसराचा, गांवचा, तालुक्याचा, जिल्हयाचा राज्याचा आणि आपल्या देशाचा विचार करून सामुहिक प्रयत्नांची पराकाष्टा प्रत्येकाने करावी म्हणजे या संकटातुन आपण सहीसलामत बाहेर पडू संजीवनी उद्योग समुह, संजीवनी युवा प्रतिष्ठान, कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष, सर्व आजी माजी पदाधिकारी, विविध संस्था, सामाजिक, सर्वपक्षीय राजकीय संघटना, शासकीय निमशासकीय प्रांताधिकारी, तहसिलदार, लोकप्रतिनिधी, पोलिस निरीक्षक, फौजदार, होमगार्ड सेवक, अंगणवाडीताई, आशासेविका, खाजगी वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कोरोना योध्दे, वीजतंत्रज्ञ, ग्रामसेवक, ग्रामसेविका, महिला बचतगट, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सोसायटी सदस्य, कामगार तलाठी, पोलिस पाटील, नगरसेवक नगरसेविका आदि ज्ञात अज्ञात घटकांचे प्रामाणिक प्रयत्नांमुळेच १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा गाठता आला आणि सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यांत साथ दिली असेही सौ. कोल्हे शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *