
कोपरगाव प्रतिनिधी:- काही कंपन्यांनी दिले रू ६. २ लाखांचे वार्षिक पॅकेज
कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीए विभागातील २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षातील ३४ विध्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आकर्षक पगारावर निवड केली असुन काही कंपन्यांनी या विध्यार्थाना प्रशिक्षण काळात रू ६.२ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी एमबीए विभागांचे व्यवस्थापन कोलमडलेले असताना संजीवनी एमबीए विभागाने उद्योग जगताला अभिप्रेत असलेले ऑफिसर्स निर्माण करून आपली वेगळी ओळख सिध्द केली आहे. संजीवनी एमबीए विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत पाहीजे त्या विध्यार्थ्याला नोकरी मिळवुन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. कंपनीचे अधिकारी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला येण्याच्या अगोदरच इच्छुक विध्यार्थ्यांना कंपनी निहाय प्रशिक्षण दिल्या जात असल्याने विद्यार्थी कंपन्यांच्या कसोटीत उतरतात आणि त्यांचे ऑफिसर होण्याचे स्वप्न पुर्ण होते.
अलिकडेच एचएफएफसी या कंपनीत सौरभ जाधव, फ्लिपकार्ट मध्ये सुमित पवार, अॅक्झा बिझिनेस सोल्युशन मध्ये तेजश्री देवडे, प्रकाश कडू व प्रकाश कडू, ओम लाॅजिस्टीक मध्ये अविनाश पवार, रोहीत आवारे, आकाश गरूड, निखिल देवरे, नानासाहेब पाईक, स्वप्नील राजपुत, स्वप्नील बारहाते, ऋशिकेश खैरनार, अभिषेक पवार, जयेश सोमवंशी व सागर पाचोरे, कॅपिटल व्हिआ मध्ये अक्षय हेलोडे,गणेश गाडेकर, गणेश पवार, मनीषा शर्मा व प्रतिक्षा पांडे, माट्रीक्स स्ट्रक्चर मध्ये अस्मिता हिवाळे मयुर वाघ व मानसी ठाकरे, बीडीओ इंटरनॅशनल मध्ये अमोल जामदार, अक्षर प्रक्षेपन मध्ये पुजा माळी, अजित खडांगळे व वैशाली चौधरी , जाना स्माॅल फायनांस बॅन्केत अनुराधा पवार, मनापुरम फायनांस लिमिटेड मध्ये प्रलय खरात, एचसीएल मध्ये साई चौधरी , सागर मोरे व ऋशिकेश शिंदे , डी मार्ट मध्ये ऋषिकेश लांडगे यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. या व्यतिरीक्तही काही कंपन्यांचे निकाल अद्याप येणे बाकी आहे.
विध्यार्थ्यांना मिळालेल्या नोकर्यांबद्धल माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, एमबीए विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपाटमेंटच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
