मराठी भाषा ही स्वयंभू तसेच स्वयंस्फूर्त आहे; सर्व संतान पासून ते शाहू फुले आंबेडकरां पर्यंतचे सर्व साहित्य मराठीत आहे:- पत्रकार सौ.संगिता मालकर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण व ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भव्य दिव्य असे अभिजात मराठी ग्रंथ दालन उभारण्यात आले. या ग्रंथ दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ तसेच अ.भा साहित्य मंडळाच्या अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, रावसाहेब कसबे, सदानंद मोरे तसेच प्रमुख कार्यवाहक जयप्रकाश जातेगावकर ,अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे व इतर मान्यवरांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले.
मराठी भाषा ही स्वयंभू तसेच स्वयंस्फूर्त आहे .सर्व संतान पासून ते शाहू फुले आंबेडकरां पर्यंतचे सर्व साहित्य मराठीत आहे .आज बारा कोटी लोक मराठी भाषेचा वापर करतात .113 देशामध्ये मराठी भाषा बोलली जाते. कित्येक शतकापासून ती राजभाषा ज्ञानभाषा म्हणून कार्यरत आहे . म्हणूनच भारत सरकारने 2004 सालापासून भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला .त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस भाषा तज्ञांच्या समितीने केली. साहित्य अकादमीने केलेली शिफारस ,हे एक लोक अभियान आहे त्याला केंद्र सरकारने सकारात्मक निर्देश द्यावे याच भावनेतून अभिजात मराठी ग्रंथालया चे दालनात शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे ही शॉर्ट फिल्म देखील दाखवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *