फटाके विक्रीबंदी बाबत नगरपालिका प्रशासनाने पुनर्विचार करावा:- फटाका विक्रेते असोसिएशन…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत फटाके विक्री व व्यापार यावर बंदी आणली आहे. परंतु या बंदीबाबत फटाके व्यावसायिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. किंवा व्यवसायिकांमध्ये कोणतीही जनजागृती किंवा प्रचार – प्रसिद्धी करण्यात आली नाही. कोपरगाव नगरपरिषदेने अचानकपणे घेतलेले हे धोरण व्यावसायिकांच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असून त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तरी सदरचा विषय तात्पुरता स्थगित करून व्यवसायिकांमध्ये जनजागृती करावी यासाठी आज महाविकास आघाडी व फटाका विक्रेते असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले. हिंदू धर्मीयांमध्ये दिवाळी सणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी किंवा इतरही सण साजरे करता आले नाही. यामुळे सर्वसामान्य जनते बरोबरच व्यापारी वर्गालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. दिवाळी सारखा उत्सव साजरा होत असताना थोड्या बहुत खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण असतानाच पालिका प्रशासनाने फटाके विक्रीला बंदी घातल्याने फटाके विक्रेत्यांबरोबरच नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, फकीरमामु कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, राजेंद्र खैरनार, प्रा.अंबादास वडांगळे, रावसाहेब साठे, डॉ. तुषारजी गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाशजी दुशिंग, विकी जोशी, प्रताप गोसावी, बाळासाहेब दवंगे, योगेश अमृतकर, विनोद नरोडे, राजेंद्र गंगूले, राजेंद्र डागा, अतुल गवारे, दिलीप वाणी, संदीप जंगम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *