श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वाचन-प्रेरणा दिवस साजरा..!!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १५आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी.यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल तोच शिकेल असे स्पष्ट केले.व हात धुवा दिना निमित्तानं वारंवार हात धुण्याचे महत्त्व समजावुन सांगितले. विदयालयांचे पर्यवेक्षक गायकवाड आर.बी यांनी डाॕ.अब्दुल कलाम यांच्या विविध घटनांचा संदर्भ देत त्यांच्या अग्निपंख ह्या पुस्तकाचा अभ्यास करा असे सांगितले. ग्रंथपाल आव्हाड ए.एल यांनी विदयार्थींना विविध पुस्तकांच्या पी.डी.एफ.फाईल स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध करुन दिल्या.
मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.अमृतकर ए.बी.यांनी तर आभार जेष्ठ क्रीडा शिक्षक डी.व्ही.विरकर यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी वाचन-प्रेरणा दिवसांच्या विदयार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दील्या.
या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक श्री. तुपसैंदर डी.व्ही,श्री.कोताडे ए.जे,श्री.एन.के.बडजाते,ए.के.काले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *