व्यसनाधिनता:- साईसेवक गणेशजी दळवी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दी. 27/9/2021 रोजी ज्योती विजय पिरानी ही एक महिला 3 लहान मुलांना घेऊन साईआश्रयात आली मी त्यांना कसे आलात विचारले असता त्यांनी सांगितले की मी अहमदनगर मधील बुऱ्हानगर येथे राहत होते माझा नवरा मला नेहमी मारहाण करून खूप त्रास देतो मी तेथे राहू शकत नाही म्हणून मी माहेरी लोणी येथे राहत होते परंतु भावाने देखील आमच्याकडे राहू नको असे सांगितले सर्व असून मला व माझ्या मुलांना कोणीही नाही आता मी काय करायचे कुठे जायचे मनात आपले जीवन संपवून टाकण्याचा विचार सुरु होता तेवढ्यात आपल्या शिर्डीतील साईआश्रया बद्दल मला एका बाबांनी सांगितले कोण होते माहिती नाही आणी मी येथे आले मी सर्व करून कहाणी ऐकली आणी आईला सांगितले की तुझी लेक आलीय बघ तिला तिचे घर परत मिळवून देऊ तो पर्यत हे तूझे माहेर घर आहे काळजी करू नको सर्व ठीक होईल असे सांगून तिला महिलांच्या निवासस्थानाकडे पाठविण्यात आले 8 दिवस ती साईआश्रयात हक्काने राहू लागली तेव्हां तिच्या घरी कळविण्यात आले व बोलावून घेतले तिचा नवरा व भाऊ इतर नातेवाईक येथे आले भावाशी चर्चा केली भावाने सांगितले की नेहमी यांचे वाद होतात आपण कुठपर्यंत लक्ष द्यायचे त्याना सांगितले की आपली बहीण आहे शेवट पर्यंत काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे असे म्हणून नाही चालत नवऱ्याला विचारले तर तो म्हणतो माझ्या विषयी काय संगीतेले मी म्हटले तुम्ही सांगा काय झाले तर म्हणतो ती म्हटली असेल की मी दारू पितो मारहाण करतो मी म्हटलो बस तूच कबूल केले आता काय बोलायचे बर आता काय करायचे तर म्हणतो ती सुधारायला हवी व तिला बोलू लागला आणी त्या दुःखी ताईचा बांध फुटला रडू लागली येथील आई ने व महिलांनी तिला समजून सांगितले पण या दगडांना पाझर फुटला नाही त्रास यांनी द्यायचा अटी देखील यांच्याच मी ताईला सांगितले की हा पुनःपुन्हा त्रास देऊ नये म्हणून याच्यावर कायदेशीर कार्यवाही करू तेव्हां तो म्हणतो की मी मुले घेऊन जातो तेव्हां आम्ही नाही पाठवत असे सांगितले ज्याचा विचार आडमुठे पनाचा त्याला काय कुणाचे चांगले कळणार तीने ही त्या सर्वांना ठणकाउन सांगितले दारू सोडून चांगलें राहत असतील तर येते नाहीतर मला हक्काचा भाऊ व साईआश्रया माहेरघर भेटले आहे

मी येणार नाही नंतर तो रागाने निघून गेला तेव्हां तिला समजून सांगितले तो परत येईल त्याला चांगला विचार करू दे त्याचि चुक कळू दे आणी तसेच झाले पुन्हा 8 दिवसांनी तो आला माझे चुकले मी परत असे वागणार नाही तुम्हाला घ्यायला आलो आहे तेव्हां ताईची सन्मानाने परत पाठवणी करण्यात आली तेव्हां शेवटी आपन सगळ संपलं अस समजतो तेव्हां साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने श्रद्धा व सबुरी कामा येते
ओम साई राम
साई सेवक – गणेश दळवी
मोब – 9637549300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *