वाचन चळवळ समृद्ध होणे गरजेचे:- पदमकांतजी कुदळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- आज काही विद्यार्थी ग्रंथ वाचत नाहीत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे भ्रमणध्वनी वापरतांना ग्रंथ वाचने गरजेचे आहे शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य नवोदितांना प्रेरणा देण्यासाठी उपक्रम राबविते आहे ग्रंथ प्रकाशित करून वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेचे सल्लागार पदमकांतजी कुदळे यांनी व्यक्त केले
स्व र म परीख हिंदी मराठी ग्रंथालय वाचनालय व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या वेळी प्रतीमा पूजन करून त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना त्यांनी दिलेला वारसा जतन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करण्यात आले
या वेळी डॉ दादासाहेब गलांडे वात्रटिकाकार अविनाश पाटील लिखित ग्रंथ देऊन युवकांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रेरणा देण्यात आली
समारंभासाठी अशोक आव्हाटे ग्रंथपाल कोळगे सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते अमीत खोकले परेश ठोळे एम पी एस सी चे विद्यार्थी बाळासाहेब आदि मान्यवर उपस्थित होते
स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल कोळगे यांनी केले अशोक आव्हाटे हेमचंद्र भवर यांनी मनोगत व्यक्त केले
प्रमोद येवले यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *