संगिताला स्वरांनी सजविणारी नवदुर्गा ”रेखा गायकवाड…”

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
नवरात्र उत्सवात आदिमाया आदिशक्ती चा जागर केला जातो तसेच महिला शक्ति ला सलाम केला जातो महिला सोशिक समंजस सहनशील आहेत तशीच धिरगंभीर विचारी आणि धाडसी आहेत
अस म्हणतात की सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरूषाचे सौंदर्य आहे असे असले तरी पुरूष संकटसमयी ढासळतो डळमळीत होतो पण कोणतीही स्त्री लवकर डळमळीत होऊ शकत नाही आणि चुकीचे निर्णय घेत नाही म्हणून स्त्री शक्ती वंदनीय पुरस्कारणीय आहे
आजतागायत महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे गुणगौरव प्राप्त केला आहे म्हणून नवरात्र उत्सव साजरा करताना समाजातील अनेक नवदुर्गांचा उल्लेखनीय कामगिरी बद्दल कौतुक केले जाते
अशीच एक नवदुर्गा संगीत क्षेत्रात आपले नाव कोरले आणि तो वारसा जतन करण्यासाठी पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे आनंद संगित विद्यालयात साधना करून गुरूवर्य आनंद राव आढाव ( आण्णा) यांच्या प्रेरणेने सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन संगीत साधना करतांना दिसतात
कालौघात समाजाची मानसिकता गरज भागविण्यासाठी शुभकार्य प्रसंगी सुत्रसंचलन व संगीत संध्या समारंभात गायन वादन करून श्रोत्यांना खिळवून ठेवले आहे
दुधात साखर म्हणजे संगीत कथा महोत्सव सुरू केला आहे आजतागायत अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत आणि आपल्या कौशल्याने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे अशा प्रतीमा संपन्न गुणवंत नवदुर्गेला लाख लाख सलाम
यांच्या संगितसाधनेला सलाम
भावि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आदिमाया आदिशक्ती चा जागर जाणिवांचा जागता ठेवणारा हा निसर्गाचा ठेवा कायम जतन करण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा मुलगी जगवा मुलगी शिकवा
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *