शेतकरी सहकारी संघातर्फे विवेक कोल्हे यांचा सत्कार..!!

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
देशपातळीवर नांवलौकीक असणा-या कोईमतुर ऊस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांचा शेतकरी सहकारी संघाचेवतीने सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संघर्षातुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगती केली आणि तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी तंत्रज्ञानातुन शेतक-यांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. याप्रसंगी उपाध्यक्ष विलास कुलकर्णी, संचालक अंबादास देवकर, वाल्मीक भास्कर, चंद्रकांत देवकर, नानासाहेब गवळी, मच्छिंद्र लोणारी, छबुराव माळी, संजय भाकरे, शिवाजीराव कदम, बाजीराव मांजरे, विजय रोहोम, रघुनाथ फटांगरे, चांगदेव आसने, कल्याणराव चांदगुडे, कैलास माळी, विश्वास गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहेर आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना विवेक कोल्हे म्हणाले की, कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या माध्यमांतुन कमी पाण्यांत, कमी खर्चात शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढवुन आधुनिक तंत्रज्ञानाने शेती फायद्याची कशी होईल हा प्रयत्न आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी ८६०३२ उस लागवडीच्या धडक योजनेत घेतलेले प्रत्येक निर्णय सभासद शेतक-यांसाठी अधिकाधिक लाभदायक कसे ठरतील यावर आपला भर आहे. शेवटी उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी आभार मानले. व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी सुत्रसंचलन केले.

फोटोओळी:-
कोपरगांव
कोईमतुर उस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांचा शेतकरी सहकारी संघाचेवतींने सत्कार करतांना अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी व सर्व संचालक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *