श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव मंदिर वतिने “महाशिवरात्र” उत्सवाची प्राथमिक तयारी पुर्ण:- महेंद्र पाटील,, सुशांत घोडके…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने ३०० वर्षांची परंपरा असलेल्या गोदावरी नदी काठालगत कोपरगाव तालुक्यातील सोमेश्वर महादेव मंदिर,गावठाण,सराफ बाजार,कोपरगाव.,महादेव मंदिर, संजीवनी पार जवळ,बेट- कोपरगाव.,गंगेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदीलगत, जेऊर कुंभारी ता.कोपरगांव
या तिनही मंदिरात “महाशिवरात्र उत्सव” भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे उत्सवासंदर्भात नियम पाळून साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी दिली आहे.

श्रीमंत महामहीम पवार सरकार हे शिवकालीन घराणे असून पाणीपतच्या रणांगणात शौर्य गाजविलेले हे घराणे आहे.ते शिवभक्त असल्याने त्यांनी कोपरगाव तालुक्यात महादेव मंदिराची उभारणी केली आहे.सदर मंदिराचे बांधकाम शिवकालीन पध्दतीचे असून दगड व चुना यांचा वापर केला असून तिनही मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेला कळस आहे.मंदिरावर कालौघात निजामशाही काळातील कारागिरीचा प्रभाव जाणवतो. कोपरगावातील पुर्वज आणि अनेक पिढ्यांनी येथे महादेवाची सेवा केली आहे.
महाशिवरात्र निमित्ताने स्थानिक व्यवस्थापन समितीचे वतीने झालेल्या विचार विनिमयात भाविकांनी खालील सुचना देण्यात आल्या आहेत.१) महादेव मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता आणि पावित्र्य राहिल याची भाविकांनी काळजी घ्यावी.२) सोमेश्वर महादेव हेच सर्वेसर्वा असल्याने भाविकांना सर्वसमान पध्दतीने थेट दर्शन गाभाऱ्यात घेता येईल.३) व्यवस्थापनाचे समानतेचे पाळून सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे.४) मंदिरात अलंकार व मौल्यवान वस्तू परिधान करणे टाळावे.५) तोंडावर मुखपट्टी(मास्क) वापरुन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.६) महाशिवरात्र दिवशी सकाळी मुख्य पुजा पहाटे होणार असून भाविकांनी सर्वांचे सोईसाठी या दिवशी सोमेश्वर महादेव गाभाऱ्यात दर्शन घेऊन लवकर बाहेर यावे.७) सोमेश्वर महादेव गाभाऱ्यात मोठ्याने आवाज होणार नाही अशा पध्दतीने ध्यान एकाग्रता ठेवून क्षणभर महादेवाचे नामस्मरण करावे.८) मंदिरात प्रवेश करतेवेळी आपला मोबाईल फोन सायलेंट मोडवर स्वता:चे जबाबदारीवर बाळगावा.तसेच मंदिरात फोनवर बोलण्यास मनाई राहिल.९) मंदिरात अथवा बाह्य बाजूस सांप्रदायिक अथवा ईतर भित्तीपत्रके व्यवस्थापनाचे पुर्व परवानगी शिवाय लावण्यास किंवा प्रचार-प्रसार करण्यास मनाई आहे.१०) शिवलिंगावर अभिषेक करतांना अभिषेक पात्र(तांब्या) वापर करावा.प्लास्टिक पाणी बाटली वापर टाळावा.११) भाविकांनी दिलेले दान व वस्तूंची पावती नियुक्त व्यवस्थापन यांचेकडून घ्यावी.व्यवस्थापनास सहकार्य करावे.१२) भाविकांचे मंदिराचे गाभाऱ्यात दर्शन झालेवर नियुक्त पुजारी यांचेकडून शिवप्रसाद वाटप होईल.
या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापन समितीचे नारायण अग्रवाल,मंगेश पाटील,महावीर शिंगी,मनोज कपोते,चंद्रकांत कौले,मनोज शिंदे,अमित गुजराथी,जयंत विसपुते,प्रविणशास्री मुळे गुरु,गोपीनाथशास्री जोशी गुरु,नंदू शेंडे गुरव,बेट व्यवस्थापनचे ॲड.सुभाष मुंदडा,तुषार कैलासराव आव्हाड,दादा नाईकवाडे,डॉ.तुषार वायखिंडे,मच्छिंद्र सोनवणे,दिपक शिंदे,खंडेराव वाघमारे गुरव,जेऊर कुंभारी व्यवस्थापनचे पाटीलबा वक्ते,दिलीप गायकवाड, नितीन लिंबोरे यांचेसह महादेव मंदिर भाविक हे महाशिवरात्र उत्सवाचे नियोजनात प्रयत्नशील असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *