उत्तर काशी(गंगोत्री)चे पवित्र गंगाजल दक्षिण काशी गोदातीरी कोपरगावात दाखल..!

कोपरगाव

भारतीय टपाल विभाग मार्फत वितरणास शुभारंभ..!

पहिले गंगा तीर्थ महादेव मंदिराना जलाभिषेक करिता वितरण..!
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर संत-महंत यासह या परिसरातील अध्यात्मिक महत्व आणि लवकरच सुरु होत असलेला पवित्र श्रावणमास यानिमित्ताने भारत सरकारचे टपाल विभागाकडे स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके यांनी गंगाजल करिता मागणी नोंदविली.त्यानुसार टपाल विभागाने गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उत्तर काशी(गंगोत्री)चे पवित्र गंगाजल स्विकारण्यासाठी टपाल विभागाने श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान महादेव मंदिर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांना निमंत्रित केले.

श्रावणामास निमित्त महादेव शिवलिंगाचे मंदिर येथे अभिषेक विविध धार्मिक विधीसाठी गंगेचे तीर्थाला विशेष महत्त्व आहे.भाविकांची गरज ओळखून भारतीय टपाल खात्याने हे तीर्थ टपाल विभागातील कार्यालयात उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे… गंगाजल तिर्थाचे विक्री वितरणास कोपरगावात सुरुवात करण्यात आली. श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे जनरल मुखत्यार श्री.महेंद्रजी पाटील, श्री दत्तपार देवस्थान व श्री स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त अॅड.श्री.जयंतराव जोशी, प्रसिद्ध व्यापारी व शिवभक्त श्री.नारायणशेठ अग्रवाल,माजी नगराध्यक्ष श्री. मंगेशराव पाटील,महादेव मंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,डाकपाल राजेंद्र नानकर,राजेश नेतनकर,कोषागार शैलैश शिलवंत,प्रमोद कवाडे, नितीन वाघमारे,रविंद्र परदेशी,सोपान गडाख, ज्ञानदेव पगारे,बापू चव्हाण,सोमनाथ तांगतोडे,दिपक गवारे यांचे सह डाक कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

शिव उपासक आणि हिंदू विधीत काशी तीर्थ स्नानाला विशेष महत्त्व आहे.भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीचे जल म्हणजे पवित्र जल मानले जाते.अनेक धार्मिक विधी मध्ये या गंगा नदीच्या पवित्र पाण्याला खूप महत्त्व आहे. परंतु हे जल प्रत्येकाला सहजासहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध करता येत नाही. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे. हे गंगाजल आता देशातील बहुतांश पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे.

गंगाजल थेट गंगोत्री येथील असून ते उत्तर काशी येथून पॅकिंग करून देशातील विविध भागांमध्ये वितरीत केले जाते.अनेकांची इच्छा असूनही तेथे स्नान अथवा धार्मिक विधीसाठी गंगेचे जल उपलब्ध करतांना वेळ आणि आर्थिक खर्च होते.ही बाब भारतीय टपाल विभागाने ओळखून गंगा नदीचे जल २५० मिली गंगाजल बंद बाटली द्वारे ३० रुपये दरात भारतीय टपाल खात्याने कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे.

कोपरगाव टपाल विभागाने मागविण्यात आलेले गंगाजल सर्वप्रथम ग्रामदैवत गोकर्ण गणेश देवस्थान,तसेच महादेव देवस्थान येथे वितरण करण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यामध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक एस.रामकृष्णा,डाक निरीक्षक संदिप हदगल यांनी कळवले आहे.श्रावणात नागरिकांना भारतीय डाक कार्यालय,कोपरगाव येथे सकाळी ९:०० ते २:०० कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार बाबत डाक विभागाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *