

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोव्हीड संकटाच्या कालावधीमध्ये शिर्डी येथील अर्थकारणाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरीक, छोटे व्यावसायिक, व्यापारी, हाॅटेल चालक यांना सर्व कर माफ करण्यात यावे, यासाठी मुंबई येथे नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.
मागील काही कालावधीमध्ये शिर्डीकरांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी यावेळी केली.
याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्ष श्री. शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी श्री. काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक श्री. मंगेश त्रिभुवन, श्री. सुजित गोंदकर, श्री. रविंद्र गोंदकर, श्री. रविंद्र कोते, श्री. अशोक गायके आदी मान्यवर उपस्थित होते.
