

कोपरगाव प्रतिनिधी:- सोशलमीडिया मुळे चुकलेल्या मुलाला मिळाले त्याचे वडील दी. 24/9/2021 रोजी शिर्डी पोलिस्टेशन यांच्या मार्फत साईआश्रयात नाव हेमंत हा मुलगा दाखल करण्यात आला होता तेव्हां मी ती पोस्ट केली होती तेव्हां मुलाचे पालक मिळावे म्हणून मी सर्वाना फॉरवर्ड करा अशी विनंती केली होती

अनेकानी तसे केले त्यामुळे अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन येथून मला फोन आला की तुम्ही जी पोस्ट टाकली आहे त्या मुलाचा हरवीला आहे असा गुन्हा या ठिकाणी नोंद आहे तेव्हां त्याचे वडील दिपक नागपुरे हे त्याला घेण्यासाठी आले होते मुलाने त्याचे नाव हेमंत हे बरोबर सांगितले होते फक्त आडनाव चुकीचे होते शिर्डी पोलिस्टेशन यांनी योग्य कार्यवाही करून त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले मुलगा व वडील भेट झाल्या मुळे खूप आनंदी दिसत हाते अशा प्रकारें साईबांबाच्या कृपेनें चुकलेल्या मुलाला त्याचे वडील मिळाले सर्व पोलिसांचे व सोशल माध्यमांचे खूप खूप आभार
ओम साईराम
साईसेवक – गणेश दळवी
मो – 9637549300
