कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कोपरगाव मध्ये सर्वपक्षीय युवकांनी एकत्र येऊन साकारली कोरोना वॉर रूम…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. काल देशभरात तब्बल चार लाख रुग्ण आढळून आलेत, ही महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात असतांनाच रुग्णांना कुठे बेड तर कुठे व्हेंटिलेटर्स मिळत नाही, रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा आहे, खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरू असून वेळेत रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.दुर्दैवाने केवळ कोरोनाने मरणाऱ्यांपेक्षा उपचाराअभावी दगावणारे अनेक जण आहेत. ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत कोपरगाव येथील एमबीए झालेले उच्चशिक्षित तुषार संजय पोटे यांनी गावातील सर्व सुशिक्षित व सर्वपक्षीय युवकांना एकत्र आणून आपल्या तालुक्याच्या सेवेसाठी, रुग्णांची मदत म्हणून वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एक हेल्पलाईन आणि वॉर रूम सुरू केली आहे.एक पाऊल मातृभूमीसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या गावच्या लोकांसाठी काम करायला अनेक युवकांनी स्वतःहुन सहभाग घेतला आहे.
तुषार संजय पोटे हे गत दशकापासून युवक काँग्रेसच्या चळवळीत जोडले गेले असल्याने सामजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असतात.त्यांना नामदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, खासदार राजीव सातव यांच्यासह कोपरगाव येथील आ.आशुतोष काळे,युवा नेते विवेक कोल्हे,राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,पतसंस्था फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काका कोयटे,नगराध्यक्ष विजयराव वहाडने,युवा उद्योजक संग्राम देशमुख व सर्व राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन मिळत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *