शासनाने लवकरात लवकर सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे युद्ध पातळीवर लसीकरण करावे व आरोग्य यंत्रणा उभारण्यास शासनाने भर द्यावा:- शरद खरात…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात आर्ध्याहून कमी होत असून कडक लॉकडाऊन व कडक निर्बंध आता या पुढे लावण्यात येऊ नये,लोकडाऊन हा शेवटचा पर्याय असून या लॉकडऊन मुळे छोट्या छोट्या व्यावसायकांना आता उपासमारीची वेळ आली आहे. जर शासनाला लॉक डाऊन वाढवायचा असेल तर प्रत्येक व्यवसैकाच्या खात्यात कोरोना अर्थ साह्या निधी टाखवा मगच लॉक डाऊन चा निर्णय घ्यावा.
मागच्या वर्षीच्या कडक लॉकडऊन नंतर आता पुन्हा कोपरगाव शहरात ५ एप्रिल पासून जवळ जवळ दीड महिन्यापासून लॉकडऊन आहे, व लॉकडऊन असला तरी विद्युत बिल, मालमत्ता कर , गाळे भाडे, GST, बँकेच्या कर्जाचे हफ्ते हे बिल मात्र शासनाला देणे आहे, त्यामुळे सर्व काळजी घेऊन आम्ही व्यवसाय सुरू करू अशी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची धारणा आहे. इतर अत्यावश्यक व्यावसायका प्रमाणे बाकीच्या ही व्यवसायकांना आपले दुकाने ४-५ तास सुरू करण्याची परवानगी मिळावी.
मागील वर्षी ही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक घडी पूर्ण कोलमडली असताना हा लॉकडऊन पुन्हा लावण्यात आला असल्याने कोरोना पेक्षा उपासमारीची वेळ आली आहे. २ वर्ष लॉकडऊन करून आता छोटा व्यापाऱ्यांची पुन्हा उभा राहण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. व्यापार बंद करून दुसरा पर्याय शोधावा लागेल, किंवा आपले जीवन संपवावे लागेल.
शासनाने लवकरात लवकर सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे युद्ध पातळीवर लसीकरण करावे व आरोग्य यंत्रणा उभारण्यास शासनाने भर द्यावा, केंद्र व राज्यसरकारच्या लसीकरणाच्या कुरघोडी राजकारणापाई छोट छोटे व्यावायिक देशो धडीला लागले आहेत . ३१ मे नंतर कडक निर्बंधाच्या नावा खाली करण्यात येणारा लॉकडऊन आता परवडणारा नाही,तरी शासनाने वरील सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती..आशा प्रकारचे निवेदन मा. तहसीलदार साहेब योगेशजी चंद्रे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *