कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी ;उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी ना.आशुतोष काळेंनी केल्या जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – ‘जगात भारी १९ फेब्रुवारी’ अर्थात शिवजयंती हा उत्सव संपूर्ण जगभरात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. कोपरगाव शहरात देखील हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरासह मतदार संघात जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.आशुतोष काळे यांनी शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्राचे अराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, प्रजा दक्ष, रयतेवर जीवापाड प्रेम करणारा रयतेचा राजा असे महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोमवार दि.१९ रोजी असणारा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवप्रेमींच्या वतीने कोपरगाव शहरात सुरू करण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहर शिवमय झाले आहे. हा उत्सव भव्य दिव्य स्वरुपात साजरा व्हावा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये अध्यक्षपदी सोमनाथ आढाव यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी रविंद्र राऊत, योगेश नरोडे व मनोज नरोडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी रहेमान कुरेशी, संतोष दळवी, राहुल शिरसाठ, राहुल चवंडके, विजय नागरे, शुभम लासुरे, सोमेश शिंदे, महेश उदावंत, शफीक शेख, शुभम जोशी, सचिवपदी तन्मय साबळे, चंद्रकांत धोत्रे, अजय आढाव, संकेत पारखे, बाळाजी देवकर, रविंद्र आहेर, आशुतोष देशमुख, अभिषेक कोकाटे, शिवाजी लकारे, आमिर पठाण, तन्मय साबळे, उमेश गोर्डे, चेतन आगळे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो ओळ-शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *