जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैय्या साकरवाडीच्या खेळाडूची चमकदार कामगिरी, तिनही गटात सलग बाराव्या वर्षी अजिंक्यपद कायम राखले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २३ सप्टेंबरला नुकतीच वाडियापार्क अहमदनगर येथे संपन्न झाली असुन या स्पर्धेत सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी च्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली असुन चौदा सतरा व एकोनिस वर्षाखालील मुलींच्या तिनही गटात सलग बाराव्या वर्षी अजिंक्यपद पटकावत विक्रम प्रस्थापित केला आहे
१९ वर्षाखालील मुलांच्या संघानेही अजिंक्यपद पटकावले असुन पुणे विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत सहा पैकी चार संघाचे नेतृत्व करण्याची संधी सोमय्या विद्यामंदिर सकरवाडीच्या खेळाडूंना मिळाली आहे
ग्रामीण भागातील असुनही या सर्व खेळाडूंनी अप्रतिम खेळ खेळत चमकदार कामगिरी करीत यशाची घोडदौड कायम ठेवली आहे आणि सोमैय्या शाळेचा नावलौकिक वाढवला आहे हे यश कौतुकास्पद असुन या यशाचे खरे श्रेय संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक समीरजी सोमैय्या यांना जाते त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळण्या साठी लागणाऱ्या सोयी सुविधा शाळेत उपलब्ध करून दिल्या असल्यानेच आमचे खेळाडू वारंवार यश मिळवत आहेत तसेच गोदावरी बायो रिफायनरीज साकरवाडीचे संचालक सुहासजी गोडगेसाहेब यांचे देखील आमच्या खेळाडूंना सतत सहकार्य लाभत असते त्यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य वाढले असल्याचे प्रशिक्षक संजय अमोलिकसर यांनी सांगितले
हे यश खेचुन आणणारे खेळाडू पुढीलप्रमाणे चौदा वर्षांखालील मुली मनीषा देशमुख ,मनिषा प्रसाद,तनुजा हिवरे,श्रद्धा टिक्कल ,तन्वी शिरसाठ तसेच सतरा वर्षाखालील मुली संजना माने,जान्हवी भदाणे,प्रांजल पगारे एकोणीस वर्षांखालील मुली श्रद्धा मलिक श्रध्दा ,तेजल कुलाल,साक्षी मलिक
एकोणीस वर्षाखालील मुले प्रणित
बाविस्कर,साई पाटील,सक्षम आवारे चौदा वर्षाखालील मुले अभिषेक मोकळ आशा सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे
बॅडमिंटनपटूंना क्रीडा प्रशिक्षक अमोलिक सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष उद्योजक सन्माननीय समीरजी सोमैय्या, सचिव सुहासजी गोडगे साहेब, सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख एजाज सर ,प्राचार्या सुनीता पारे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जेसर मल्हार कुलकर्णी यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले
सोमैय्या उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडी शाळेचे शिक्षकवृंद विद्यार्थी व पालक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *