अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली आहे….

अहमदनगर

अहमदनगर प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली आहे.
नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था, पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था, कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था व बिगर शेती संस्था मतदार संघ अशा चार जागांच्या निवडणुकीनंतर आज शनिवारी (6 मार्च) दुपारी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये अ‍ॅड.उदय शेळके यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या 21 जागांची नुकतीच निवडणूक झाली आहे. या पैकी 17 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या व फक्त 4 जागांची निवडणूक झाली. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनीका राजळे, नरेंद्र घुले पाटील आदीसह संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *